rat16p25.jpg-
N45592
गणपतीपुळे ः संकष्टीनिमित्त परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांमुळे गणपतीपुढे किनारा गजबजला
-rat16p26.jpg-
45593
मंदिरात दर्शनासाठी लागलेल्या रांगा.
-rat16p27.jpg-
45594
समुद्रसफरीचा आनंद घेताना पर्यटक.
-rat16p28.jpg-
45595
जलक्रीडासाठी किनाऱ्यावर आणलेली नवनवीन साधने
-rat16p30.jpg-
45597
गणपतीपुळे येथील पार्किगची जागाही वाहनांनी भरलेली आहे.
-rat16p31.jpg-
45598
दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भक्त
-rat16p32.jpg-
N45599
श्री गणेश
(छाया ः किसन जाधव, गणपतीपुळे)
-------------------------
संकष्टीनिमित्त गणपतीपुळेत दर्शनासाठी प्रचंड गर्दी
शासकीय सुट्टी पथ्यावर ; दिवसभरात ३० हजार पर्यटकांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ः शनिवार, रविवार जोडून शासकीय सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळेत संकष्टीनिमित्त आज प्रचंड गर्दी होती. अनेकांनी कालपासूनच केलेला मुक्काम लॉजिंग व्यावसायीकांच्या पथ्यावर पडला. पहाटेपासूनच श्रींच्या मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी होती. दिवसभरात सुमारे ३० हजार पर्यटकांची नोंद झाल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बारावी बोर्डाच्या परिक्षा सुरू झाल्या असून दहावीच्या परिक्षाही लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे सध्या पर्यटन व्यवसायाला मंदीचे दिवस आहेत. तरीही रविवारी संकष्टी असल्यामुळे एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळेत दाखल झालेले होते. पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, मुंबईतील पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होती. बहुसंख्य लोकांच्या चारचाकी गाड्या असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता होती. मात्र पोलिसांनी कालपासूनच योग्य नियोजन केले होते. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय झालेली नव्हती. रविवारी पहाटे पूजाअर्चा झाल्यानंतर ५ वाजता गणपतीपुळे मंदिरात श्रींच्या दर्शनाला सुरुवात झाली. मंदिर परिसरात मंडप असल्यामुळे शिस्तबद्धपणे भक्तगण दर्शन घेताना दिसत होते. दर्शन घेतल्यानंतर पर्यटकांची पावले आपसूकच किनाऱ्याकडे जात होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंदिर प्रशासन, ग्रामपंचायतीकडून जीवरक्षकांची नियुक्ती केली गेली आहे. दिवसभर पर्यटकांची गर्दी राहिल्यामुळे किनाऱ्यावरील फेरीवाले, दुकानदार, शहाळे विक्रेते, खेळणी विकणारे, हॉटेल व टपरी चालकांना अच्छ दिन आले आहेत. दिवसभरात सरासरी दीड कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सायंकाळी साडेचार वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. यावेळी मुख्य पुजाऱ्यांसह ट्रस्टी आणि भक्तगण उपस्थित होते.
दरम्यान, गेले आठवडाभर वातावरणातही बदल झाला असून दिवसा कडकडीत उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तरीही पर्यटकांचा उत्साह कायम होता. उन्हामध्ये जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सरसावले होते. त्यामुळे व्यावसायिकांना चांगला फायदा झाला.
------
कोट
संकष्टीच्या मुहुर्तावर दर्शन घेण्यासाठी भक्तगण गणपतीपुळेत एक दिवस आधी येऊन राहिलेले होते. त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. निवास करून रविवारी सकाळी दर्शन घेऊन पर्यटक माघारी परतले. जोडून सुट्टी असल्यामुळे परजिल्ह्यातील पर्यटकांना फायदा झाला. यावेळी स्थानिकांचीही गर्दी होती.
- प्रमोद केळकर, हॉटेल व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.