कोकण

‘ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन’चा जिल्हावासीयांना होतोय फायदा

CD

‘ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन’चा जिल्हावासीयांना होतोय फायदा

पाचपैकी चार तक्रारींचे निरसन; सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या उपक्रमाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातर्फे सुरू केलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन’वर ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पाच ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. यातील चार तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. यात दोन तक्रारी या आधारकार्ड संदर्भात होत्या. त्याही तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून शनिवारी (ता.८) कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेऊन सिंधुदुर्ग पोलिस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन क्रमांकाचे लोकार्पण केले होते. सोमवारी (ता.१०) पासून हेल्पलाईनवर ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी नोंद व्हायला सुरू झाल्या. पाच समस्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी ४ तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात आले असून एका तक्रारीचे निरसन करण्याबाबत संबंधीत विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.

१० ला विश्राम दत्तात्रय ठाकुर (रा. आडेली-पलतडवाडी ता. वेंगुर्ले) यांनी ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनला संपर्क साधून माहिती देवून आधरकार्डवर थम लागत नसल्याने गेली तीन वर्षांपासून रेशन मिळत नसल्याने मदत करण्याची विनंती केली. ११ ला सायंकाळी पूजा प्रकाश परब (वय ७०, रा. द्वारका अपार्टमेंट, कीर्ती हॉटेल जवळ, कुडाळ) यांनी मोबाईल क्रमांकावरुन ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनला संपर्क साधून आपले पती प्रकाश भास्कर परब (वय ८१) यांची २८ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मऊ शहरामध्ये क्लिीनिक लॅब होती. त्याच दरम्यान त्यांना विजेचा धक्का लागला आणि तेव्हापासून ते आजारी आहेत. त्यांच्या मागील १० वर्षांपासून हालचाली मंदावल्या असून ते पूर्णपणे बेडवर आहेत. त्यांचे अद्याप आधारकार्ड काढलेले नाही. आधारकार्ड नसल्याने त्यांना शासकीय व अन्य वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने अडचणी येत असून आम्हाला मदत करा, असे कळविले. ही माहिती पोलिस अधीक्षक अग्रवाल यांना कळविल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पथकासह संबंधीत ज्येष्ठ नागरीक यांच्या घरी तात्काळ जाऊन त्यांची आपुलकीने चौकशी करत आधारकार्ड काढून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासीत केले. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गनगरी येथील आधारकार्ड सेवा केंद्राचे संचालक बाळ खडपकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना सबंधित ज्येष्ठ नागरिक यांचे आधारकार्ड काढून देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन १२ ला ऑपरेटर उषा करलकर यांच्या मदतीने प्रकाश परब यांचे बायोमॅट्रीक ठसे व आयरिश घेऊन तसेच ऑनलाईन फॉर्म भरुन आधारकार्ड काढुन देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. फिंगरप्रींट व आयरिश घेण्यामध्ये खूप अडचणी येत होत्या. पोलिस पथकाने व त्यांचे कुटुंबीयांसमवेत सर्वतोपरी प्रयत्न करुन त्यांचे यशस्वीरित्या फिंगरप्रींट व आयरिश घेतले. त्यामुळे पुढील कार्यवाही करणे सुलभ झाले. तसेच श्री. ठाकुर यांच्या शिधापत्रिकेबाबत ज्येष्ठ नागरिक कक्ष, भरोसा सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या पथकाने तहसील कार्यालय, वेंगुर्ले यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. त्यानंतर तात्काळ रेशन धान्य सुरू करण्याबाबत कार्यवाही केली.
---
पॉईंटर
तक्रारींची तातडीने दखल
- पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून ज्येष्ठांसाठी मोहीम
- कुडाळातील मेळाव्यात हेल्पलाईन क्रमांकाचे लोकार्पण
- सोमवारपासून तक्रारी नोंद होण्यास सुरुवात
- पाच दाखल, चार तक्रांरींचे तातडीने निरसन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT