कोकण

वक्तृत्व शैलीमुळे व्यक्तिमत्व विकास

CD

45625

वक्तृत्व शैलीमुळे व्यक्तिमत्व विकास

प्रियांका नाईक ः बांदा केंद्रशाळेत विविध स्पर्धांना प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः वक्तृत्व शैलीतून विदयार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. उत्कृष्ट वक्ता हा जगाच्या पाठीवर कुठेही टिकाव धरू शकतो. शालेय जीवनातच वक्तृत्व शैली विकसित करण्यासाठी श्री स्वराज्य प्रतिष्ठान सातत्याने स्पर्धांचे आयोजन करत असते, हे कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धाचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे केले.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व, पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा ः वक्तृत्व स्पर्धा दुसरी ते चौथी गट-सार्थक राणे (जिल्हा परिषद इन्सुली क्र. १०), सर्वज्ञ वराडकर (केंद्रशाळा बांदा क्र. १), दक्ष वालावलकर (सुधाताई कामत शाळा क्र. २ सावंतवाडी). पाचवी ते सातवी गट-मैथिली सावंत, प्रणिता सावंत (दोन्ही नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली), श्रुतिका राजगोळकर (इन्सुली क्र. ५). आठवी ते दहावी गट- मिताली कोठावळे (नूतन माध्यमिक इन्सुली), शमिका आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ).
पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धा ः पहिली ते तिसरी गट-सार्थक वालावलकर, वेदांत वीर, ईश्वरी गवस. चौथी ते सहावी-सर्वज्ञ वराडकर, आर्या ठाकर, दुर्वा नाटेकर. सातवी ते दहावी गट-वासंती धुरी, नैतिक मोरजकर, सीमा गवस. विजेत्यांना बुधवारी (ता. १९) आयोजित शिवजयंती सोहळ्यात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी व्यासपीठावर सरपंच नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, परीक्षक प्रकाश तेंडोलकर, प्रा. वैभव खानोलकर, हेमंत गवस, शुभेच्छा सावंत, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी बांदेकर, रीना मोरजकर यांनी केले. उपाध्यक्ष केदार कणबर्गी, जे. डी. पाटील, संकेत वेंगुर्लेकर, शुभम बांदेकर, नारायण बांदेकर, समीर परब, अनुप बांदेकर, ओंकार हळदणकर, राज येडवे, शौनक वाळके, अक्षय मयेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : सिंहगड रोड पानमळा परिसरात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT