शिरगाव ग्रामपंचायतीत
मंगळवारी नेत्र तपासणी
रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयातर्फे शिरगांव ग्रामपंचायतीत मंगळवारी (ता. १८) सकाळी १० ते २ या वेळेत मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मोफत चष्मे वाटपही होणार आहे. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर यांनी केले आहे.
-------
श्री ज्योतिबा मंदिराच्या
खेट्यांना सुरवात
रत्नागिरी : शहरातील पेठकिल्ला येथील श्री ज्योतिबा मंदिरात ज्योतिबाच्या खेट्यांना सुरुवात झाली असून, हा सोहळा ९ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. एकूण चार खेटे होणार आहेत. पेठकिल्ला येथील श्री ज्योतिबाच्या मंदिरात दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो. सध्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने मूर्ती लगतच्या हॉलमध्ये स्थापन करण्यात आली आहे. याच ठिकाणी श्रींची पूजाअर्चा व दर्शन होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष राजन शेट्ये यांनी केले आहे.
------
गुरुमळीतील नवलाईचा
आज प्रथम वर्धापन दिन
रत्नागिरी : शहराजवळील नाचणे-गुरुमळी येथील श्री नवलाई, पावणाई, जाकादेवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोमवारी (ता. १७) साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता १७) सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत नवचंडी याग, तसेच सत्यनारायणाची महापूजा व दुपारी १ ते २ या वेळेत खिचडी प्रसाद, सायंकाळी ३ ते ७ या वेळेत हळदी-कुंकू, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत भजन, रात्री ९ ते १२ या वेळेत ढोलवादन स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन चतुःसीमा नाचणेतर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.