कोकण

संक्षिप्त

CD

सागर महोत्सवात
‘डीबीजे’चे यश
चिपळूणः रत्नागिरी येथे आयोजित सागर महोत्सवात डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचे ५ विद्यार्थी आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे ५ विद्यार्थी सहभगी झाले होते. सागर महोत्सवातात सागर प्रज्ञा शोध, सागर फोटोग्राफी आणि व्हिलॉग तयार करणे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सलोनी घडशी, फिझा खान, श्रीराम भागवत यांनी यश संपादन केले. डॉ. राहुल पवार, प्रतीक्षा मोहिते, डॉ. राजू झोरे आणि प्रा. लोंढे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
------------------------
बाळ जाधव यांचा
शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
चिपळूण : शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांचे बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा देऊन त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री रामदासभाई कदम, आमदार किरण सामंत, उपनेते सदानंद चव्हाण, राजन साळवी आदी उपस्थित होते.
-------------------
क्रिकेट स्पर्धेचे
आंबडसमध्ये उद्घाटन
चिपळूण : खेड तालुक्यातील आंबडस कदमवाडी येथील नवतरुण उत्साही मित्रमंडळातर्फे आयोजित अंडरआर्म बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रोहिदास समाजसेवा संघ सातगाव विभागाचे अध्यक्ष संतोष सावर्डेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी संतोष सावर्डेकर यांनी मोबाईलच्या युगात आंबडस येथील नवतरुण मित्र मंडळाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून तरुणांमध्ये खेळांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल कौतुक करताना मंडळाने विद्यार्थी व तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करावे असे आवाहन केले.
--------------------------
चिपळुणात रंगणार
महिलांसाठी अभिनय स्पर्धा
चिपळूण : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे ९ मार्चला फक्त महिलांसाठी जिल्हास्तरीय अभिनय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. ३० ते ५० आणि ५० वर्षांच्या पुढील खुला गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. नावनोंदणीची अंतिम तारीख २ मार्च आहे. जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखेचे प्रमुख कार्यवाह डॉ. मिनल ओक आणि स्पर्धा प्रमुख आदिती देशपांडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

Badlapur Crime: तस्करीचे धागे नाशिकपर्यंत! स्त्रीबीजप्रकरणी अटक डॉक्टरला पोलिस कोठडी

Gajanan Maharaj elephants Video: शेगावातील श्री गजानन महाराजांचे हत्ती आठवतात का? रामकली-चंपाकलीचा 2007 चा व्हिडिओ व्हायरल

Lucky Mulank : 'या' मूलांकाच्या मुली लग्नानंतर नवऱ्यासाठी ठरतात लकी; घरी होतो मोठा धनलाभ, लक्ष्मीच्या पावलाने बदलतात सासरच्यांचे नशीब

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

SCROLL FOR NEXT