कोकण

संगमेश्वर-उक्षी घाटातून अवजड वाहतूक अखेर बंद

CD

rat16p33.jpg-
45631
संगमेश्वरः उक्षी घाटातील अवजड वाहतूक बंद करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले फलक.
rat16p34.jpg-
45632
संगमेश्वरः उक्षी घाटात अडकणाऱ्या अशा ट्रकमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती.
--------------
उक्षी घाटातून अवजड वाहतूक अखेर बंद
ग्रामस्थांच्या मागणीला यश; अनेक गाड्या अडकून पडल्याच्या घडल्या होत्या घटना
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ः गोव्याहून संगमेश्वरच्या दिशेने जाताना मोबाईलवरील लोकेशनवरून शॉर्टकट मारण्याच्या नादात उक्षी घाटात कंटेनर अडकल्याच्या घटना गेल्या चार ते पाच महिन्यात घडल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून या घाटातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने या मार्गावर दोन्ही बाजूला फलक लावून अवजड वाहतूक बंद केली आहे.
हा रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा आणि चढ-उताराचा आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने अनेकजण उक्षीमार्गे रत्नागिरीत येण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात. मात्र हा मार्ग अरुंद असल्याने अवजड वाहने वळणावर अडकतात आणि वाहतूक कोंडी होते. ही अडकलेली वाहने काढण्यासाठी ग्रामस्थांसह वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागते. याचा फटका ग्रामस्थांसह वाहनचालक, गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांनाही बसतो. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक थांबवावी अशी मागणी उक्षी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने उक्षी घाटातून अवजड वाहतुकीला बंदी असणारे फलक दोन्ही बाजूने लावले आहेत.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT