कोकण

रत्नागिरी- बसणीच्या शेट्ये हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

CD

rat16p29.jpg
45596
रत्नागिरी : बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलमध्ये आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमावेळी बोलताना प्रसाद गवाणकर. सोबत मार्गदर्शक सत्यवान रेडकर.
-----------

शेट्ये हायस्कूलमध्ये
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
रत्नागिरी, ता. १६ : बसणी येथील जी. एम्. शेट्ये हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सीमा शुल्क विभाग मुंबईचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी केले. त्यांनी स्पर्धा परीक्षेविषयी सखोल माहिती दिली. जवळपास तीन तासांत त्यांनी विद्यार्थी, परीक्षार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व संस्था पदाधिकाऱ्यांना अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.
युपीएससी, एमपीएससी, सरळ सेवा भरती, बँक रिक्रुटमेंट अशा विविध स्पर्धा परीक्षा विषयी माहिती देताना परीक्षेचे नाव, पात्रता, वयोमर्यादा व त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे अशी विस्तृत माहिती दिली. शिक्षक व संस्था पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम म्हणजे रेडकर यांनी ज्ञानाची कवाडे आपल्याला उघडी करून दिली, असे मत प्रसाद उर्फ बापू गवाणकर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनीही बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मंथन वायंगणकर याने अशा प्रकारच्या परीक्षा असतात याची माहिती आपल्यापर्यंत यापूर्वी व्यवस्थित पोहोचली नव्हती. परंतु आता मात्र आम्ही निश्चित प्रयत्न करू, असे सांगितले. शिक्षिका सायली मयेकर यांनी पुन्हा स्पर्धा परीक्षांकडे वळावे, अशी इच्छा बळावल्याचे सांगितले.
चारुशीला बाउसकर या स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थिनीने आजचे व्याख्यान खूपच माहितीपूर्ण होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांविषयी अधिक सजग होता आले. विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व शिक्षकांच्या मदतीने ज्ञानार्जन करावे, असे सुचवले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, असे मत व्यक्त केले. मुख्याध्यापक नाईक यांनी आजचे मार्गदर्शन बहुमोल होते. बऱ्याच परीक्षांची माहिती पहिल्यांदा सर्वांसाठी उघड झाली असल्याचे मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT