45666
मंगेश मुद्रस यांची बैलगाडी प्रथम
राज्यस्तरीय स्पर्धेत यश; जिल्हास्तरावर कदम विजेते
वैभववाडी,ता.१६ ः बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे विजेते उंबर्डे येथील मंगेश मुद्रास ठरले तर उपविजेते आबासाहेब पाटील, तृतीय क्रमांक सागर यादव यांच्या बैलगाडीने पटकावला. तसेच जिल्हास्तरीय गावठी बैलगाडा शर्यत स्पर्धेमध्ये चलिंद्र गणपत कदम यांची बैलगाडी प्रथम ठरली.
नाधवडे येथील महादेव मंदिरासमोरील माळरानावर बंड्या मांजरेकर मित्र मंडळाच्यावतीने बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन केले होते. दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून ७० बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन झाले. सायंकाळी या स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले.
राज्यस्तरीय स्पर्धेचा इतर निकाल ः गोट्या राहणे चतुर्थ, रमेश पावस्कर (पाचवा), नितीन देसाई (सहावा), राजू बागवे (सातवा), स्वराज गुरव (आठवा ) तानाजी साळवी (नववा), बाबा गांधी (दहावा) यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रशांत झोरे (द्वितीय), दिलीप कांबळे (तृतीय), दशरथ बेळेकर (चतुर्थ), लिंगेश्वर पावना देवी प्रसन्न (पाचवा). तसेच उत्कृष्ट बैलजोडी आई अंबाबाई प्रसन्न (अजय नारकर), उत्कृष्ट चालक बबन झोरे यांची निवड झाली. बक्षीस वितरण समारंभाला माजी आमदार प्रमोद जठार, प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, सज्जन रावराणे, भालचंद्र साठे, गुलाबराव चव्हाण,उद्योजक हनुमंत नारकर, संतोष कानडे, बाबा कोकाटे, दाजी पाटणकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.