‘भंडारी पतसंस्थे’ला कोकण भूषण पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १८ ः येथील भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला २०२५ चा प्रतिष्ठित ‘कोकण भूषण’ पुरस्कार मिळाला आहे. कोकण विभागात सहकारी पतसंस्थांच्या कार्याला गौरवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. १६ फेब्रुवारी रोजी अलिबाग येथे याचे वितरण झाले. भंडारी हितवर्धक संस्थेने १५ ते २५ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संस्थेची आर्थिक स्थिती चांगली आहे. पुरस्कार वितरणावेळी अध्यक्ष सचिन तोडणकर, उपाध्यक्ष सचिन तोडणकर आणि पराग भाटकर हे उपस्थित होते. ‘कोकण भूषण’ पुरस्कार केवळ भंडारी हितवर्धक संस्थेच्या कार्याचा गौरव नाही तर ग्रामीण विकासात सहकारी पतसंस्थांच्या योगदानालाही मान्यता देतो. इतर संस्थांनाही उत्कृष्ट कार्य करण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणा देतो. या संस्थेने आर्थिक सेवा पुरवण्यासोबतच उद्योजकता वाढवणे आणि कोकण विभागात लोकांना सक्षम बनवण्याचे कार्य केले आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.