‘लाडकी बहीण’चे अंगणवाडी सेविकांकडून सर्वेक्षण
निकषात बसणाऱ्यांनाच लाभ ; अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ः विधानसभा निवडणुकीआधी घाईने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेबाबत लवकरच फेरसर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. ज्यांना या योजनेत अनुदान मिळाले आहे त्या सर्व लाभार्थी महिला निकषात बसतात की नाही, हे या सर्वेक्षणात तपासले जाणार आहे. ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्यांना यातून वगळण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी करण्याचे काम जिल्ह्यातील २ हजार ६५० अंगणवाडी सेविका करणार आहेत. त्यामध्ये चारचाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी तसेच कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे, त्यांचाही या योजनेतून पत्ता कट करण्यात येणार आहे. आता जिल्ह्यातील किती महिला त्यात राहतील आणि कितीजणींची नावे वगळली जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या कुटुंबातील सदस्या आय़कर दाता आहेत, ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहेत किंवा सेवानिवृतीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. कुटुंबातील सदस्य विद्यामान किंवा माजी खासदार, आमदार आहेत. कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तसेच कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन आहे, असे कुटुंब लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहेत. पात्रतेसाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला. कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ६० वर्षे पूर्ण होईपर्यत अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थींचे बॅंकखाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
----
‘त्यांनी’ अनुदान नाकारले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणांना लाभ देणे बंद करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले. त्यामुळे लाडक्या बहिणींची धावाधाव सुरू झाली असून, आतापर्यत १२ बहिणींनी अनुदान घेणे बंद केले आहे; मात्र जिल्ह्यात केवळ एवढ्याच बहिणी अनुदान नाकारण्यास पुढे आल्या आहेत तर ४ लाख १८ हजार ७८५ बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.