कोकण

जयवंत दळवींच्या साहित्यावर उहापोह

CD

46005

जयवंत दळवींच्या साहित्यावर उहापोह

काव्यवाचनास प्रतिसाद; आजगाव प्रेरणा कट्ट्याचा मासिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग बावन्नावा मासिक कार्यक्रम नुकताच फणसखोल-आसोली येथील मंगलमूर्ती गणेश मंदिरात झाला. काव्यवाचन कार्यक्रमात सोमा उर्फ दीपक गावडे, स्नेहा नारिंगणेकर व विनय सौदागर यांनी कविता सादर केल्या.
दरम्यान, या कार्यक्रमात जयवंत दळवी यांचे पुतणे तथा उद्योजक सचिन दळवी, साहित्य प्रेरणा कट्टयाचे समन्वयक तथा नामवंत कवी विनय सौदागर, गोव्यातील साहित्यिक तथा निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर व शिरोडा येथील साहित्यिक स्नेहा नारिंगणेकर यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्या साहित्याविषयी व जीवन चरित्राविषयी सविस्तर विवेचन केले.
नामवंत गायक शेखर पणशीकर यांनी गायिलेल्या ‘गजमुखा वंदन तुज पहिले’ या भक्तिगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. फणसखोल येथील इंग्रजी विषयाचे पदवीधर असलेले ८५ वर्षीय नागरिक चंद्रकांत गावडे यांच्या व इतर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विनय सौदागर, सचिन दळवी, गजानन मांद्रेकर, एकनाथ शेटकर, प्रकाश मिशाळ, स्नेहा नारिंगणेकर, अनिता सौदागर, अविनाश जोशी, विनायक उमर्ये व शेखर पणशीकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास फणसखोल परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
साहित्य प्रेरणा कट्ट्याचे फणसखोल येथील सदस्य दीपक गावडे यांनी स्थानिकांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे शिस्तबद्धरित्या आयोजन केले. त्यांनी केलेल्या ऋणनिर्देशाने कार्यक्रमाची सांगता झाली. हे वर्ष सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने साहित्य प्रेरणा कट्ट्याचे यावर्षीचे सर्व कार्यक्रम ‘जयवंत दळवी समजून घेताना’ या शीर्षकाखाली आयोजित केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT