-rat१८p१.jpg
२५N४५९४९
- संगमेश्वर ः डांबरीकरण रखडल्यामुळे माखजन-मावळंगे रस्त्याची झालेली चाळण.
माखजन-मावळंगे रस्त्याची चाळण
वाहनचालकांची कसरत ; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशाला
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन ते मावळंगे या दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामाला शासनाच्या बजेटमधून निधी मंजूर आहे. मागील वर्षी मे २०२४ अखेरीस या रस्त्यावर खडी पसरून ठेवण्यात आली होती. त्यामुळे सगळी खडी वर आली असून, रस्त्याची चाळण झाली आहे. या खडीवरून दुचाकी, चारचाकी चालवणं कठीण झाले आहे. याचा त्रास मावळंगे ग्रामस्थांना गेले आठ महिने सहन करावा लागत आहे. पुढील पंधरा दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिला आहे.
मावळंगे ग्रामस्थांना बाजारहाट, वैद्यकीय सोयी, शाळा-महाविद्यालयासाठी माखजन येथे यावे लागते. त्यामुळे मावळंगे ते माखजन या रस्त्यावरून दिवसभर वाहतूक सुरू असते. हा दोन किलोमीटरचा रस्ता खराब असल्यामुळे आजारी माणसाला माखजनला प्राथमिक आरोग्यकेंद्र किंवा खासगी डॉक्टरकडे आणायचे असेल तर मावळंगे-तुरळ-आरवली-माखजन असा २८ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. शाळा, कॉलेजला येणाऱ्या मुलांना या उखडलेल्या खडीवरून चालताना खूपच त्रास होत आहे. सध्या लग्नसराई सुरू झाल्यामुळे लोकांना नेणारी वाहने चालवणे कठीण झाले आहे. डांबरी रस्ता नको पूर्वीचा मातीचा होता तो बरा, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. ग्रामस्थांची होणारी परवड दूर करा अन्यथा आंदोलन करू, अशी नाराजी भायजे यांनी व्यक्त केली.
---
असा शोधला पर्याय
मावळंगे गावातील लोकांनी फार वर्षांपूर्वीची गावातून जाणाऱ्या चिऱ्याच्या पाखाडीचा शोध लावला आहे. ती जुनी पाखाडी साफसफाई करून तिथून पायपीट सुरू केली आहे. रस्त्याला पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ आली असून, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.