कोकण

कासार्डे शाळेचे आज वार्षिक स्नेहसंमेलन

CD

कासार्डे शाळेचे आज
वार्षिक स्नेहसंमेलन
तळेरे : कासार्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कासार्डे-तांबळवाडी येथे उद्या (ता. १९) श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन सायंकाळी ७ वाजता आयोजित केले आहे. हा कार्यक्रम कासार्डेच्‍या सरपंच निशा नकाशे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश पारकर, उपसरपंच गणेश पाताडे, माजी सरपंच संतोष पारकर, उद्योगपती शांतिनाथ लडगे, नामदेव बांदिवडेकर, केंद्रप्रमुख संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य अभिजित धुमाळ, श्रद्धा शेलार, पोलिसपाटील स्वाती पाताडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीरंग पाताडे, कासार्डे विकास सोसायटीचे चेअरमन दीपक सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजता बक्षीस वितरण व त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीने केले आहे.
---
हस्ताक्षर स्पर्धेमध्ये
‘फ्लाईंग टॉटस’चे यश
सावंतवाडी : मुंबई येथे झालेल्या एड्यू स्मार्ट इंकच्या नॅशनल अबॅकस ड्रॉईंग व हॅन्ड रायटिंग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भटवाडी, सावंतवाडी येथील फ्लाईंग टॉटस स्कूलचा विद्यार्थी कार्तिकेय निकुम याने ज्युनियर गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या परीक्षेला देशातून हजारो विद्यार्थी बसले होते. याच स्कूलच्या शारवी नाईक हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. तसेच राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत किमया राऊळ हिने सीनिअर गटात दुसरा क्रमांक, तर चातुरिया धारगळकर हिने ज्युनिअर गटात प्रथम क्रमांक मिळविला. गिरीधर कोरेगावकर (अबॅकस), निधी गुंजाळ (अबॅकस) व श्रीशा गवस (चित्रकला) तसेच रियांश राणे यांनी चित्रकलेत यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य व पालकांनी अभिनंदन केले.
..............
तळेरे येथे आज
शिवजयंती सोहळा
तळेरे : तळेरे ग्रामस्थांतर्फे उद्या (ता. १९) सकाळी शिवजयंतीचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. तळेरे बसस्थानकासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रंगमंचावर हा कार्यक्रम सादर होणार आहे. यावेळी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, ११ वाजता स्विटलँड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मर्दानी खेळ व सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने सादर होतील. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन तळेरे ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT