46071
ई-केवायसीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवा
आबा धारगळकर ः सावंतवाडीत पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः शासनमान्य रास्त धान्य दुकानात ई-केवायसीची करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी देण्यात आली आहे. एवढ्या कमी कालावधीत ई-केवायसी करून देण्यासाठी लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. बांदा शहरात ८०० हून अधिक लाभार्थ्यांची ई-केवायसी न झाल्याने ते शासनाच्या मोफत धान्य योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे ई-केवायसीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी बांदा उपसरपंच राजाराम ऊर्फ आबा धारगळकर यांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी दीपाली गोटे यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी आहे. तसेच शेतकरी वर्ग काजू बागायतीत व्यस्त असल्याने अनेक लाभार्थी शासनाच्या मोफत धान्य योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी ई-केवायसीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवून द्यावी. ज्येष्ठ व आजारी असलेल्या नागरिकांना ई-केवायसी करण्यासाठी गृहसेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोफत धान्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे ई-केवायसीची पूर्तता न केलेल्यांना मोफत धान्य योजनेतून वगळण्यात येणार आहे. शासनाची ही योजना सर्वसामान्य जनतेसाठी लाभदायी आहे. सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा असल्याने ग्रामीण भागात अनेकवेळा मोबाईल नेटवर्कची समस्या असते. त्यामुळे ऑनलाईन ई-केवायसी करत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने याचा विचार करून मुदत वाढवून द्यावी, असे म्हटले आहे. यावेळी संदेश सातार्डेकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.