मुणगेत तीन मार्चला
रेकॉर्ड डान्स स्पर्धा
मुणगे ः निवती मेढा (ता. वेंगुर्ले) येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त ३ मार्चला रात्री ९ वाजता खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १०,००० (सतीश आचरेकर, मालवण पुरस्कृत), ७००० (नीळकंठ मेतर) व ३००० (मिताली व भावार्थ नरसिंह भगत पुरस्कृत), उत्तेजनार्थ प्रथम १००० (ज्ञानदा व सार्थक भगत), द्वितीय १००० (सावली व नीलेश कैलास मेतर पुरस्कृत) अशी पारितोषिके व कायमस्वरुपी चषक नीलेश सावंत यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. स्पर्धेत नाव नोंदणीसाठी मिनार परब, नीलेश सावंत, जानू धुरी यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन विठ्ठल रखुमाई मंदिर समितीने केले आहे.
...............
इन्सुली येथे आज
दशावतार नाटक
बांदा ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इन्सुली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या निमित्ताने जय भवानी कला, क्रीडा मंडळ इन्सुली गावठाण येथे उद्या (ता. १९) सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे, सायंकाळी ७ वाजता आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.