कोकण

मंडणगड -वेळासमधून ५० कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली

CD

-rat१८p२८.jpg
46013
वेळास : किनाऱ्यावर हॅचेरीत ३२ घरट्यांतून ऑलिव्ह रिडलेची अंडी सुरक्षित करण्यात आली आहेत.

वेळासमधून समुद्रात झेपावली ५० पिल्ले

बदलत्या वातावरणामुळे विलंब; कासव महोत्सवही लांबला

मंडणगड, ता. १८ : मागील दोन वर्षांपासून बदललेल्या वातावरणामुळे कासवांचे गाव म्हणून ओळख तयार झालेल्या वेळास किनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या उमटलेल्या पाऊलखुणा पाहायला दोन महिन्यांचा विलंब झाला. किनाऱ्यावरील हॅचेरीमध्ये ३२ घरट्यांतून ३ हजार ५७९ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यातून आतापर्यंत ५० पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. लवकरच कासव महोत्सव घोषित होण्याची शक्यता आहे.
ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या संरक्षण मोहिमेमुळे वेळास हे गाव गेल्या १६ वर्षांपासून जगाच्या नकाशावर आहे. त्यामुळे गावात पर्यटन उद्योग विकसित झाला आहे. कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी स्थानिक तसेच राज्यासह देशातील पर्यटक व अभ्यासक या गावास भेट देत असतात. यंदाचा कासव विणीचा हंगाम वातावरणातील बदलामुळे विविध कारणांनी लांबणीवर गेला. २०२१ पर्यंत अंडी सापडण्यास हंगामास सप्टेंबर महिन्यात सुरुवात होत होती. घरट्यात अंडी संरक्षित केल्यावर साधारपणे ९० दिवसांनी या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडतात व समुद्रात निघून जातात. २०२२ च्या हंगामात १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील पहिले घरटे वेळास किनारी सापडले होते. २०२३ मध्ये मात्र तब्बल दोन महिने उलटून गेले तरी हंगामास सुरुवात झाली नव्हती. तीच परिस्थिती यावर्षीही आहे. गतवर्षी ४ जानेवारीला पहिले घरटे आढळून आले होते. मागील काही वर्षांत अंडी लवकर सापडल्याने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांतही कासवांचा जन्मसोहळा पाहण्याची संधी कासवप्रेमींना मिळाली होती; मात्र दोन वर्षांपासून हा महोत्सव मार्च, एप्रिलमध्ये करावा लागत आहे.
जगभरात आढळणाऱ्या कासवांच्या सातपैकी पाच प्रजाती भारतात आढळतात. पश्चिम किनारपट्टीचा विचार केल्यास गुजरात व महाराष्ट्र आणि गोवा किनाऱ्यांवर सागरी कासव अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. त्यापैकी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या माद्या कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात.
------
चौकट
राखीव क्षेत्र बनविण्याचा प्रस्ताव रखडला
भारतातील पहिले प्रस्तावित राखीव क्षेत्र घोषित करण्यासाठी वेळास येथील समुद्रकिनारी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी गतवर्षी डिसेंबर महिन्यात पाहणी दौरा केला होता. समुद्री कासव संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून वेळास किनारा घोषित करण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चाही झालेली होती; मात्र तो प्रस्ताव लांबलेला आहे.
-----
चौकट
वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष *घरटी *अंडी *झेपावलेली पिल्ले
२०१९ *२१ *२२३५ *९४१
२०२० *२३ *२७१५ *११४८
२०२१ *४४ *४८१८ *२१५०
२०२२ *५४ *५८८४ *३१७५

२०२३ *३६ *३६८३ *-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT