कोकण

देवरूख ः पाटगावमधील तरुणाचा मलकापूर येथे अपघाती मृत्यू

CD

- rat18p5.jpg

अमर पांचाळ

पाटगावमधील तरुणाचा
मलकापूर येथे अपघाती मृत्यू
संगमेश्वर, ता. १८ ः देवरूखनजीकच्या पाटगाव-गवंडीवाडीतील तरुणाचा कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. अमर अशोक पांचाळ (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी; अमर पांचाळ याचे मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील नांदळज असून कामानिमित्त पांचाळ कुटुंबीय गेली अनेक वर्षे पाटगाव-गवंडीवाडी येथे वास्तव्यास आहे. शनिवारी अमर पांचाळ व रोशन लिंगायत हे कामानिमित्त मोटारसायकलने मलकापूर येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर दोघेही परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये अमरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला; तर त्याच्यासोबतच्या रोशन याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरच्या अपघाती मृत्यूची बातमी पाटगाव व नांदळजमध्ये समजताच हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी पाटगाव येथे आणण्यात आल्यावर शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

SCROLL FOR NEXT