कोकण

रत्नागिरी ः क्राईम

CD

शेकोटी घेताना वृद्धा भाजली
रत्नागिरी ः येगांव (ता. चिपळूण) येथे परिसरातील कचरा गोळा करून जाळत असताना वृद्ध महिला ६० टक्के भाजली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रगती पर्शुराम महाडिक (वय ६०, रा. येगांव, चिपळूण) असे तिचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) सकाळी नऊच्या सुमारास येगांव येथे घडली. प्रगती महाडिक या घरी असताना त्यांनी घराच्या परिसरातील पालापाचोळा गोळा करून तो जाळला. तेथे शेकोटी घेत असताना त्यांच्या गाऊनने पेट घेतला. त्यामध्ये त्या ६० टक्के भाजल्या. त्यांच्या मुलीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नंतर प्राथमिक आरोग्यकेंद्र कामथे येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी मंगळवारी (ता. १८) जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
-------
वाहतुकीस अडथळा
करणाऱ्या चालकांवर गुन्हा
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील लांजा येथील एका हॉटेलच्या समोर रहदारीस अडथळा होईल, अशी वाहने पार्क करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसमुद्दीन सुभानअल्ली (वय ३२, रा. खैराही, उत्तर प्रदेश) व सद्दाम हुसेन मोहम्मद हदीस (३३, रा. पाली) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास लांजा येथील कोकण किनारा हॉटेलसमोर रस्त्यावर निदर्शनास आली. संशयित चालकांनी डंपर (एमएच ०५, इएल १५८१) व डंपर (एमएच ०५, इएल १५८०) या सार्वजनिक ठिकाणी रहदारीस व वाहनांना धोका होईल, अशा स्थितीत पार्क केले होते. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल रहीम हसन मुजावर यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT