कोकण

कणकवलीत साकारल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती

CD

46113


कणकवलीत साकारल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती

विद्यामंदिरचा उपक्रम ः विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. १८ : शहरातील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रशालेच्या प्रांगणात विविध किल्ल्याच्या प्रतिकृती साकारल्या. याला चांगला प्रतिसाद मिळाला.
शालेय जीवणात अंगीकृत केलेला वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रशालेच्या परिसरात दिवसभर कष्ट घेऊन पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतीचे राज्य पुन्हा प्रशालेच्या परिसरात किल्ल्याच्या रूपात साकार केले. इतिहाची साक्ष सांगणारे आणि प्राचिन शिवकलेचे विविध नमुणे रायगड, प्रतापगड, राजगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, तोरणा असे एकापेक्षा एक देखणे गडकिल्ले विद्यार्थांनी कल्पकतेने तयार करून शिवछत्रपतींच्या संपूर्ण जीवन कार्यांची आठवण करून दिली. दगड मातींचा वापर करून सुंदर अशी सजावट केली. विविध किल्ले जिवंत करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे होते. यासाठी कला शिक्षक प्रसाद राणे, जे.जे. शेळके, विद्या शिरसाट यांनी विद्यार्थांना प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापक पी.जे. कांबळे यांनी विद्यार्थांना इतिहासातील शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देत ऐतिहासिक किल्ले हे राष्ट्राचे धन आहे. त्यांचे जतन करावे, असे आवाहन केले. पर्यवेक्षक अच्युतराव वणवे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी किल्ल्यांची पहाणी करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT