कोकण

सेवाव्रती भावनेतून जीवन समृद्ध करा

CD

46279

सेवाव्रती भावनेतून जीवन समृद्ध करा

डॉ. प्रमोद वालावलकर ः कुडाळात राष्ट्रसेवा दल परिवारातर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, १९ ः समाजात जो बदल घडावा असे आपल्याला वाटते, तो बदल आपल्यापासून सुरू व्हावा. आपल्या सामाजिक जीवनात गाव कसे समृद्ध होईल, आपला परिसर कसा समृद्ध होईल, याचा प्राधान्याने विचार करावा. आपल्यातील निराशावादी दृष्टिकोन बाजूला ठेवून मिळालेले प्रत्येक काम चोखपणे करून विविधांगी चांगुलपणा जोपासावा, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद वालावलकर यांनी कुडाळ येथे आयोजित सत्कार समारंभात केले.
निःस्वार्थ वैद्यकीय सेवेतून गोरगरिबांसाठी सेवाभावी कर्तृत्व जपणारे डॉ. वालावलकर यांचा त्यांच्या सेवेबद्दल कुडाळ नागरिक व राष्ट्रसेवा दल परिवार यांच्यावतीने कुडाळ-एमआयडीसी येथील बॅ. नाथ शिक्षण संस्थेच्या सभागृहात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे पत्रकार विनोद शिरसाट, सामाजिक कार्यकर्त्या कमल परुळेकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्रसाद रेगे, श्रीमती मनोरमा महादेव चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष दयानंद चौधरी, साहित्यिक प्रवीण बांदेकर, धीरज परब, अॅड. सुहास सावंत, अतुल बंगे, संजय वेतुरेकर, संदीप निंबाळकर, श्रीराम शिरसाट, ओंकार तेली, विठ्ठल पाटणकर, राजन नाईक, मेघा सुकी, विद्याप्रसाद बांदेकर, मंदार शिरसाट, पी. डी. शिरसाट, आनंद वालावलकर, प्रज्ञा वालावलकर, नरेंद्र वालावलकर, घनश्याम वालावलकर आदी उपस्थित होते. डॉ. वालावलकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ‘महाराष्ट्राची लोक यात्रा’ पुस्तक व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
विनोद शिरसाट यांनी, अलीकडे सेवाभाव दुर्मीळ होत चालला असताना डॉ. वालावलकर यांच्यासारख्या सेवाव्रतींनी तो जिवंत ठेवला आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचा बोध घेऊन जगण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. दयानंद चौधरी यांनी डॉ. वालावलकर यांचे कार्य गावासाठी भूषणावह व अभिमानास्पद असल्याचे सांगितले. कमल परुळेकर यांनी डॉ. वालावलकर यांच्या आचार-विचारांतून त्यांच्या कार्याची प्रचिती येते, असे सांगितले. अॅड. सावंत यांनी वालावलकर यांच्यामध्ये आपल्याला क्रांतिकारी गांधी दिसले, असे सांगितले. सन्मानपत्र वाचन संजय वेतुरेकर यांनी केले. प्रफुल्ल वालावलकर यांनी निवेदन केले.
--
‘मनुष्यातील चांगुलपणा फायद्याचा’
डॉ. वालावलकर म्हणाले, ‘‘हुशार असणे समाजासाठी घातक आहे, तर चांगुलपणा असणे हे सर्वांत चांगले आहे. आपण समाजासाठी चांगले काम केले पाहिजे. आपला गाव, माणसे कशी समृद्ध होतील, याचा सतत विचार करा. आपण संस्काराने मोठे होतो. आई वडील व आजूबाजूचा मित्रपरिवार यांच्यामुळे आपण घडतो. चांगले काम करण्याची क्षमता असली पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT