rat19p6.jpg-
KOP25N46208
रत्नागिरीः जय शिवाजी जय भारत पदयात्रेला झेंडा दाखवताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि अन्य अधिकारी.
rat19p3.jpg-
46205
रत्नागिरीः मारूती मंदिर येथून काढलेली पदयात्रा.
--------------
रत्नागिरीत घुमला ‘जय शिवाजी, जय भवानी’ चा जयघोष
शिवजयंतीनिमित्त पदयात्रा ; महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी ठरले आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत ''जय शिवाजी, जय भवानी'', ''हर हर महादेव'' अशा जयघोषात, लेझीम, ढोलच्या निनादात आज सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनी या पदयात्रेत लक्ष वेधून घेत होत्या.
मारूती मंदिर येथून काढलेल्या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते झाले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शिर्के हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी रूबीना सय्यद, पृथा पांचाळ, अहना पेठे, पायल वसावे यांनी पोवाडा म्हटला. या कार्यक्रमातून पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण पुढे न्यायची आहे, असे आवाहन पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. ही पदयात्रा मारूती मंदिर चौकातील शिवसृष्टीजवळ आली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा शासकीय रुग्णालयाजवळ आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थ्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांचा पेहराव आणि पदयात्रेतील सहभागी विद्यार्थिनींनी केलेला पारंपरिक पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. लेझीम पथक, ढोल यांच्या निनादात छत्रपतींच्या जयघोषात निघालेल्या या पदयात्रेने वातावरण शिवमय बनले होते. टिळक आळी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ही पदयात्रा रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवसृष्टीजवळ आली. येथेही छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
पदयात्रेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी भिकाजी कासार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदाफुले, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, बिपिन बंदरकर यांच्यासह दामले विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, जीजीपीएस हायस्कूल, एनसीसी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, शासकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, भागेश्वर विद्यामंदिरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
-------
चौकट
सर्वांनी आरोग्याकडे लक्ष द्या ः जिल्हाधिकारी
आरोग्यासाठी चालणे हे फायद्याचे असते. सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे त्यासाठी किमान दररोज 1 किमी तरी चालावे. विशेषत: अधिकाऱ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आवाहन केले.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.