कोकण

राजापूर : अनधिकृत गाळ्यामुळे पिकअप् शेडचे काम रखडले

CD

rat18p9.jpg
46273
राजापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देताना उन्हाळे ग्रामस्थ.

अनधिकृत गाळ्यामुळे शेडचे काम रखडले
उन्हाळे ग्रामस्थ संतापले ; मुंबई-गोवा महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ः मुबई-गोवा महामार्गावर उन्हाळे गंगातीर्थ फाट्याजवळील अनधिकृत दुकान खोक्यामुळे पिकअप् शेडचे काम रखडले आहे. तेथील अनधिकृत खोका हटवून पिकअप् शेड बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी उन्हाळे ग्रामपांयत व ग्रामस्थांनी केली आहे.
उन्हाळे गावातील महिलांनी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले आहे. तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झालेले आहे; मात्र महामार्गावर एसटी थांबे असलेल्या अनेक ठिकाणी पिकअप् शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून काही एसटी पिकअप् शेड मंजूर झालेल्या असून, काही शेडची कामेही पूर्ण झालेली आहेत. उन्हाळे गंगातीर्थ फाट्याजवळ पिकअप् शेड व्हावी याकरिता उन्हाळे गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यानंतर तिथे पिकअप् शेड मंजूर झाली आहे; मात्र ज्या ठिकाणी शेड बांधण्यात येणार आहे तिथे अनधिकृत दुकानगाळा उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे शेड उभारण्यात अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत बांधकाम विभागाने संबंधित दुकानगाळा धारकाला पत्रव्यवहार करून दुकानगाळ्यांची शेड हटवा, अशी विनंती केली होती. तसा ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामसभेतही अनधिकृत शेड हटवण्याचा ठराव करण्यात आला; मात्र अद्यापही अनधिकृत दुकानगाळा हटवण्यात आलेला नाही. त्यामुळे अखेर उन्हाळे गावातील महिला ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत उपअभियंत्यांची भेट घेतली. तो अनधिकृत खोका तत्काळ हटवून पिकअप् शेड बांधकाम करावे, अशी मागणी या महिलांनी केली आहे. त्यामुळे आता प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT