कोकण

मालवणात घुमला शिवरायांचा जयघोष

CD

46280

मालवणात घुमला शिवरायांचा जयघोष

पदयात्रेला प्रतिसाद; पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी शहरात ‘जय शिवाजी, जय भारत’, भव्य पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या निमित्ताने ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यामुळे संपूर्ण शहर शिवमय बनल्याचे दिसून आले.
सकाळी आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने या पदयात्रेचे उद्‍घाटन करण्यात आले. टोपीवाला हायस्कूल येथून ढोल ताशांच्या गजरात या पदयात्रेस सुरुवात झाली. यात माजी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अन्य शासकीय अधिकारी, टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल, रोझरी इंग्लिश स्कूल, जयगणेश इंग्लिश मीडियम स्कूलसह सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी, शिवप्रेमी, पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टोपीवाला हायस्कूल ते फोवकांडा पिंपळ मार्गे, मेकॅनिकल रोड, भरड बाजारपेठ मार्गे मेढा ते राजकोट किल्ला अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. पदयात्रेत घोडे, चित्ररथांनी लक्ष वेधले. रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने भगवे झेंडे संपूर्ण मार्गावर लावले होते. त्यामुळे संपूर्ण मालवण शहर शिवमय झाल्याचे दिसून आले. या पदयात्रेत सहभागी झालेल्या आमदार दीपक केसरकर यांनी ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेल्या कलाकारांचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. राजकोट किल्ला येथे या पदयात्रेची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT