कोकण

छत्रपती शिवराय, संत रोहिदासांचे कार्य प्रेरक

CD

46286

छत्रपती शिवराय, संत रोहिदासांचे कार्य प्रेरक

पंढरी चव्हाण ः कुडाळात चर्मकार समाजतर्फे संयुक्त जयंती

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः संत रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासात या दोन्ही महनियांचे फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी आज कुडाळ येथे केले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना ‘गौरव रत्नांचा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई यांच्यावतीने संत रोहिदास महाराज जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी संस्थान मराठा समाज सभागृहात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा ‘गौरव रत्नांचा’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आडला. यावेळी जिल्हाध्यक्ष सी. आर. चव्हाण, सरचिटणीस संतोष जाधव, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, उद्योजक बाबल पावसकर, प्राजक्त चव्हाण, अरुण होडावडेकर, मालिनी चव्हाण, डॉ, प्रतीक्षा चव्हाण, भारत पेंडूरकर, सहदेव चव्हाण, समाजसेवक बबली राणे, देवगड तालुकाध्यक्ष सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
सरचिटणीस जाधव यांनी, छत्रपती शिवरायांची रयतेचा राजा म्हणून ख्याती संपूर्ण जागतिक पातळीवर आहे. अशा राजाच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय चर्मकार समाजाच्या वतीने अनेकांचा गौरव होत आहे, असे सांगितले. आवळेगाव बीटचे पोलिस कर्मचारी मंगेश जाधव यांनी माझ्या समाजाने केलेला गौरव मला प्रेरणा देणारा आहे, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष सी. आर. चव्हाण यांनी चर्मकार समाज हा एकत्र येऊन होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटित होण्याची गरज व्यक्त केली. यावेळी गेली २५ वर्षे समाज क्षेत्रात कार्यरत असणारे ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणेंसह विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पेंडूरकर यांनी केले. आभार संतोष जाधव यांनी मानले.
.................
‘शिवरायांचे योगदान फार मोठे’
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘समाजाच्या वाटचालीत छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान फार मोठे आहे. समाजातील घटकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. त्यांचा आदर्श प्रत्येकाने जोपासून वाटचाल केली पाहिजे. आपला समाज संघटितरित्या न्याय्य प्रश्नासाठी एका छत्राखाली येणे काळाची आवश्यक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

Latest Marathi News Live Update: रोहित शेट्टी फायरिंग प्रकरण चार महिन्यापासून फरार आरोपीला उत्तरप्रदेश मधून अटक

अमरावती प्रकरणात फक्त दोन मुलींचे व्हिडीओ; अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात धक्कादायक माहिती, नवनीत राणांनाही फटकारलं...

Black Magic Scam : 'तुझ्या दीराचा आत्मा घरात आहे..'; भीती दाखवून महिलेला भारत-पाक सीमेपर्यंत नेलं, भोंदूसह पोलिस पत्नीचा अजब कारनामा, 11 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT