46287
दोडामार्ग फ्रिकवेन्सी शाळेत
छत्रपती शिवरायांना वंदन
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १९ : आज शिक्षण आणि संस्कार यांचा ताळमेळ महत्त्वाचा आहे. आपल्या मुलांना संस्कारमय शिक्षण द्यायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दिला पाहिजे. छत्रपतींच्या विचारातच खरे संस्कारमय शिक्षण आहे, असे मत पत्रकार तेजस देसाई यांनी केले.
शहरातील फ्रिकवेन्सी स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी देसाई यांच्या समवेत व्यासपीठावर माजी सैनिक राजेश गवस, विस्तार अधिकारी सुजित गायकवाड, मुख्याध्यापिका कीर्ती खोबरेकर, शिक्षिका रक्षता कुबल, शीतल पटकारे, दीप्ती खरवत आदी उपस्थित होते. विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याने ऐतिहासिक वेशभूषा परिधान केली होती. किल्ले प्रतिकृतीही बनविण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कोमल नाईक यांनी केले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.