शिक्षक क्षमता वृद्धी
प्रशिक्षण देवरुखात
संगमेश्वरः जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणाऱ्या आमुलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना सक्षम करणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकांनी समजून घेऊन प्रभावी कामकाज करावे. नवीन शैक्षणिक धोरण देशाला दिशा देणारे ठरेल, असा विश्वास तज्ञ मार्गदर्शक मिलिंद कडवईकर यांनी व्यक्त केले. ते देवरूख येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात बोलत होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रप्रमुख निकिता नलावडे, दिव्या भाटकर, विषयतज्ञ समीर काब्दुले, सानिका भितळे आदी उपस्थित होते. या वेळी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर ते म्हणाले, भारताला महासत्ता बनवताना सुजाण नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. ३४ वर्षानंतर शैक्षणिक धोरण बदलले जात आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी असलेला शैक्षणिक बदल, व्यावसायिक शिक्षण, निरंतर शिक्षण, समाजाभिमुख शिक्षण, विद्यार्थ्याला घडवता घडवता वैश्विक नागरिक बनवणे, भारतीयत्वाचा सखोल अभिमान रूजवणे आदी सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव नवीन शैक्षणिक धोरणात केला आहे.
-----
उबाठाची आज
रत्नागिरीत बैठक
रत्नागिरी ः शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कार्यकारिणीची बैठक गुरूवारी (ता. २०) दुपारी साडे बारा वाजता अभ्युदयनगर येथील संपर्क कार्यालयात होणार आहे. या वेळी माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख संजय कदम, सहसंपर्कप्रमुख सचिन कदम, प्रभारी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम व जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस आदी उपस्थित राहणार आहेत.
-----------
कबड्डी स्पर्धेमध्ये
‘नवनिर्माण’ विजयी
संगमेश्वर ः स्वयंभू श्री जाकादेवी मंडळाच्यावतीने आयोजित नाईट कबड्डी स्पर्धेमध्ये संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. कावडी पिलकेवाडी समाजमंदिर येथे ही स्पर्धा झाली. लांजा संघाला उपविजेतेपद मिळाले. विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक देण्यात आला.
--------------------
चित्रकला स्पर्धेत
अद्वज चव्हाण प्रथम
संगमेश्वर ः सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट या चित्र शिल्पकला महाविद्यालयात शिवजयंती कलात्मक पद्धतीने साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यावर विद्यार्थ्यांनी पोवाडे गायले. महाराजांना मानवंदना म्हणून महाराजांच्या जीवनावर आधारित मुलांनी चित्रे काढली. त्यातून मोठ्या गटातून अद्वज चव्हाणने प्रथम, सौरभ साठेने द्वितीय, प्रथमेश गोंधळीने तृतीय क्रमांक मिळवला. छोट्या गटातून भूषण वेलये, साहील परूळेकर, ज्योती पांचाळ यांनी क्रमांक मिळवले. मुलांनी केलेल्या चित्राचे प्रदर्शन आठ दिवस कला महाविद्यालयाच्या कलादालनात सर्व कला रसिकांसाठी खुले आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.