कोकण

रत्नागिरी ः यंदा मुबलक हापूस उशिराने बाजारपेठेत

CD

rat19p37.jpg-
46342
रत्नागिरीः कलमांना लगडलेल्या कैरीची गळ थांबवण्यासाठी बागायतदारांना प्रयत्न करावे लागत आहेत.
-------
यावर्षी मुबलक हापूस उशिराने बाजारपेठेत
बागायतदारांना चिंता; बदलते हवामानामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः बदलते हवामान आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले असून, सततच्या फळगळतीमुळे यावर्षी आंबा उशिराने बाजारपेठेत दाखल होईल, अशी भीती बागायतदारांमधून व्यक्त केली जात आहे.
हापूस आंब्याचे उत्पन्न चांगले मिळावे यासाठी आंबा बागायतदार लाखो रुपये खर्च करतात; मात्र दरवर्षी बदलत्या हवामानाचा फटका या बागायतदारांना बसतो. यंदाही तीच स्थिती आहे. आतापर्यंत चार ते पाचवेळा औषध फवारण्या झाल्या असून, पुढील पंधरा दिवसात आणखी फवारण्या कराव्या लागणार आहेत. गेल्या काही दिवसात कधी थंड तर कधी उष्ण वातावरण रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेला आहे. त्यामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. हंगामाच्या सुरवातीला आलेला मोहोर चांगलाच बहरला होता; मात्र अचानक उष्मा वाढल्याने मोहोर गळून जाऊ लागला आणि पुन्हा कलमांना पालवी फुटू लागली. आतापर्यंत तीनवेळा असे प्रकार झाले आहेत. दरवर्षी आंबा बाजारात येण्याचा पहिला टप्पा १५ मार्च ते २० मार्च असतो; मात्र या वेळी फारच कमी प्रमाणात आंबा येण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलांपासून वाचलेला आंबा बाजारपेठेत येईल. तिसऱ्यांदा आलेल्या मोहोरामुळे एप्रिल १० नंतर मुबलक आंबा बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.

कोट
यंदा हवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढत आहे. पहिल्या मोहोराची फळं काही प्रमाणात गळून गेली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आंबा वाढला आहे. तिसरा मोहोर आता आलेला आहे. सध्या थंडीचे प्रमाण कमी-जास्त झाले की, त्याचा आंब्यावर परिणाम होतो. अपेक्षित फळधारणा होत नाही तसेच फवारण्याही वाढत आहेत.
- जयवंत बिर्जे, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT