कोकण

मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर

CD

मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञान वापरा
नितेश राणे ः जिल्ह्याची गरजेनुसार प्रणाली विकसित करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाच आहे. याचा प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करावा. आपण तयार करत असलेले हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरणारे असेल. पारंपरिक आणि पर्ससिन मच्छीमार यांच्यात फरक असला तरीही किनारपट्टीच्या प्रत्येक जिल्ह्यात मासेमारीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामुळे एकाच पद्धतीची योजना किंवा व्यवस्था सर्वच जिल्ह्यांत लागू करणे व्यवहार्य नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे एआय तंत्रज्ञानाची प्रणाली विकसित करावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.
मंत्रालयात सागरकिनाऱ्यांवर होणारी घुसखोरी रोखणे आणि सागरीसुरक्षा बळकट करणे तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मंत्री राणे यांनी देशभरातील एआय तंत्रज्ञानाविषयी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, मत्स्योत्पादनात वाढ आणि सागरीसुरक्षा ही विभागाची प्राथमिकता आहे. सागरी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी असे दोन वेगवेगळे भाग आहेत. या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्पादनवाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशा प्रकारे नियोजन करता येईल. राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा सागरकिनारा लाभला आहे. या किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सध्या ड्रोनचा वापर केला जात आहे. त्यातून जमा झालेल्या माहितीचा वापर करून सागरीसुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल या विषयी विद्यार्थ्यांनी विचार करावा तसेच विभाग स्वयंपूर्ण करणे, विभागाचा महसूल वाढवणे, मत्स्य व्यवसायातील, बंदरांच्या विकासातील अडचणी सोडवणे, अंमलबजावणीमध्ये असलेल्या काही त्रुटींची पूर्तता करणे, विभागाचा संपूर्ण कारभार पारदर्शक करणे यांसह अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून विभागाचे कामकाज आणखी प्रभावीपणे करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे या विषयीही सविस्तर सादरीकरण विद्यार्थ्यांनी तयार करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
-----
विद्यार्थ्यांच्या संकल्पना
विद्यार्थ्यांनी सुरक्षा आणि उत्पादनवाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करावयाच्या उपायांविषयी नवनवीन संकल्पना सुचवल्या. त्यात मच्छीमारांसाठी मुख पडताळणी (फेस रेकग्निशन) प्रणाली तयार करणे, किनारा मॅपिंग करणे, जीपीएस फेन्सिंग लावणे, तलावांचे मॅपिंग करणे, एखाद्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर एआय तंत्रज्ञान अधारित विकास प्रकल्प राबवण्यात यावा आणि त्यातून होणारे फायद्यांचे एक रोल मॉडेल तयार करून संपूर्ण राज्यात योजना राबवावी, सागरीसुरक्षेविषयी एक स्वतंत्र एआय मॉडेल तयार करावे, मासेमारीसह हवामान आणि योग्य परिस्थितीचा अंदाज वर्तवणारे एआय आधारित मॉडेल तयार करणे, अशा संकल्पना विद्यार्थ्यांनी मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT