कोकण

जिल्ह्यात हापूसच्या 2075 निर्यातक्षम आंबा बागांची नोंद

CD

(आंब्याचा फोटो वापरावा)

हापूसच्या २०७५ निर्यातक्षम बागांची नोंद
मँगोनेटवरील नोंदणीसाठी २८ पर्यंत मुदत ; आंब्याला चांगला दर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी केली जाते. २०२४-२५ मध्ये आज अखेर रत्नागिरी जिल्ह्यातून २ हजार ७५ निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबाबागांची मँगोनेट या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्यासाठीची मुदत नवी दिल्लीतील अपेडा कार्यालयाच्या आदेशानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
निर्यातक्षम आंबा फळबागेत योग्य कृषी पद्धती (Good Agriculture Practices) राबवणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय किंवा शेतकरी स्तरावर ठेवायचे कागदपत्र विहित प्रपत्रात जतन करून ठेवावीत. निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र -१) अर्ज दाखल करावयाचा आहे. त्यासाठी सातबारा, ८ अ, आधारकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांमार्फत म्हणजेच कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी हे क्षेत्राची तपासणी करून त्याची माहिती प्रपत्र ४ अ मध्ये भरून तो अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर २ ब प्रपत्रात नोंदणी प्रमाणपत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्यादृष्टीने शेतात राबवण्यात येणाऱ्या महत्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्र -क मध्ये वेळेत घेणे आवश्यक आहे. मँगोनेट प्रणालीमुळे स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत हापूस आंब्याला निर्यातीमध्ये चांगला दर प्राप्त होईल. बाजारपेठांमध्ये तीव्र स्पर्धा असल्यामुळे निर्यात हा चांगला पर्याय आहे. जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांना २०२४-२५ मध्ये चालू हंगामाकरिता मॅंगोनेटवर नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून मँगोनेटद्वारे नोंदणीसाठी त्वरित अर्ज सादर करावेत. निर्यातक्षम आंबाबागांची वेळेत नोंदणी करण्याक‍रिता अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
----
कोट
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंबा निर्यात करण्यासाठी भौगोलिक मानांकनाचा (GI) चांगल्याप्रकारे उपयोग होण्यासाठी मँगोनेट प्रणालीवरती सहभाग नोंदवावा.

- पांडुरंग सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT