कोकण

सामाजिक बांधिलकीची इशाऱ्याची सावंतवाडी पालिकेकडून दखल

CD

47591

‘सामाजिक बांधिलकी’च्या
इशाऱ्याची पालिकेकडून दखल

रस्त्यावरील खड्डा बुजविण्याची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः शहरातील लक्ष्मीनगर येथे डॉ. सावंत यांच्या दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तिठ्यावर पडलेल्या खड्डा तत्काळ बुजवावा; अन्यथा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून तो बुजवण्यात येईल, असा इशारा देताच पालिकेच्या बांधकाम विभागाने कार्यवाही करण्याचे आश्वासन सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, रूपा मुद्राळे यांना दिले.
शहरातील लक्ष्मीनगर येथे डॉ. सावंत यांच्या रुग्णालयानजिक रस्त्यावर खड्डा पडला होता. त्याचे रूपांतर मोठ्या खड्ड्यात झाले आहे. खड्ड्यातून खडी व मोठमोठे दगड बाहेर पडून अपघाताच सत्र सुरू आहे. काल (ता.२४) रात्री एका महिलेची मोटरसायकल घसरुन तिला गंभीर दुखापत झाली. या गोष्टीची गंभीर दखल घेऊन शहरामध्ये झिरो अपघात मिशन राबवणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जाधव, लक्ष्मण कदम, मुद्राळे व त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी नगरपालिका बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांना घटनास्थळी बोलून घेतले व तत्काळ खड्डा बुजवण्याचे काम हाती घेऊन येथील रहिवाशांना सहकार्य करा, अशी मागणी केली. अन्यथा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा खड्डा आजच्या दिवशी बुजवला जाईल, असेही सांगण्यात आले. त्यावर श्री. राऊळ यांनी तो खड्डा बुजवला जाईल, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT