swt2515.jpg
47593
सिंधुदुर्गनगरीः सहकार चळवळीतील २५ वर्षांच्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना वीर सावरकर पतसंस्थेचे व्यवस्थापक विष्णुकांत परब, कर्ज व्यवस्थापक किशोर चिटणीस आदी.
वीर सावरकर पतसंस्थेचा
सिंधुदुर्गनगरीत सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः येथील वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार चळवळीतील २५ वर्षांच्या योगदानाबद्दल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ओरोस-सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात पतसंस्थेचे व्यवस्थापक विष्णुकांत परब, कर्ज व्यवस्थापक किशोर चिटणीस यांनी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. यावेळी कणकवली सहाय्यक निबंधक कृ. रा. धुळप, सावंतवाडी सहाय्यक निबंधक एस. एस. कदम, कुडाळ सहायक निबंधक एस. पी. मरभळ आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सोमवारी (ता. २४) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था व जिल्हा उपनिबंधक यांच्यावतीने पतसंस्थांचे सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा देणाऱ्या सहकारी पतसंस्थांचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ आणि क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत सहकारी पतसंस्थांचे सक्षमीकरण व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ बाबत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.