कोकण

प्रगती करा

CD

तंत्रज्ञान, नेटवर्कद्वारे प्रगती करा
मेहेर पुदुमजीः ‘फिनोलेक्स’मध्ये स्नेहसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : संधी मिळत नसतात तर त्या निर्माण कराव्या लागतात याकरिता त्यांनी फिनोलेक्स अॅकॅडमीचे संस्थापक (कै.) प्रल्हाद पी. छाब्रिया यांचे उदाहरण दिले. त्यांनी आपले उद्योगविश्व विस्तारात असताना समाजात शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचे ठरवले व ते प्रत्यक्षात आणले. आजच्या पिढीला ज्ञान, तंत्रज्ञान व जागतिक नेटवर्क हे उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून ते हव्या त्या क्षेत्रात आपली प्रगती करू शकतात, असे प्रतिपादन थरॅक्स ग्लोबलच्या अध्यक्षा श्रीमती मेहेर पुदुमजी यांनी केले.
फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश अय्यर, अध्यक्षस्थानी डॉ. अरूणा कटारा व मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आदी उपस्थित होते.
अय्यर यांनी आवड, ज्ञानाची भूक, शिस्त ही सर्वांगीण प्रगतीची त्रिसूत्री असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी कुठलेही काम नाईलाज म्हणून न करता आवडीने करावे. त्यामध्ये बरेच काही करून दाखवण्यासाठीची भूक असावी व या सर्वाला शिस्तीची जोड मात्र खूप महत्वाची आहे. आयुष्यात वैयक्तीक पात्रता, उपलब्ध पाठबळ तसेच पैसा याहीपेक्षा वेळ ही महत्वाची असते.
विद्यार्थी प्रतिनिधींनी कॉलेजमधील विविध स्तरावरील घटनांचा मागोवा घेतला व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांबद्दल माहिती दिली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १२ लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. संस्थेच्या विकासासाठी अविरत सेवा देणाऱ्या फिनोलेक्स अॅकॅडमीमधील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दीर्घसेवा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
---
कोट
२७ वर्षांपूर्वी या महाविद्यालयाची स्थापना (कै.) प्रल्हाद पी. छाब्रिया यांनी केली. आजही हे महाविद्यालय अव्वल दर्जाचे महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. उद्योग व शैक्षणिक सहयोग महत्वाचा आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय उद्योगासाठी आवश्यक असणारे अभियंते पुरवते व त्यामुळे उद्योगधंद्याची वाढ होते तर उद्योगामध्ये या अभियंत्यांना आपले ज्ञान उपयोगात आणण्याची संधी मिळते.
- डॉ. अरूणा कटारा, अध्यक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज विद्यार्थ्याला वडिलांची कॉलेजमध्ये घुसून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त! प्रति 100 ग्रॅममागे तब्बल 95,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलार पोर्टल बदलांवरून महावितरणविरोधात मोर्चा

Maharashtra Weather Alert : राज्यात उन्हाचा भडका की पावसाची एन्ट्री? पुढील 48 तास ठरणार निर्णायक; हवामान खात्याचा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा!

'रक्ताच्या उलट्या झाल्या, बेशुद्ध पडले अन्...' दीपाली सय्यदने सांगितला भंयकर प्रसंग, म्हणाली..'माझे डोळे वर गेले आणि...'

SCROLL FOR NEXT