47613
प्रीती सामंत ठरल्या
‘कोलगाव सौभाग्यवती’
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २५ ः कोलगाव येथील ‘माणुसकी प्रतिष्ठान’ आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेत राज्ञी सामंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. महिलांसाठी आयोजित ‘कोलगाव सौभाग्यवती’ स्पर्धेत प्रीती सामंत विजेत्या ठरल्या.
शिवजयंतीनिमित्त कोलगाव ग्रामपंचायत रंगमंचावर आयोजित या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहा वर्षांखालील वेशभूषा स्पर्धेत एकूण ४६ लहान मुले सहभागी झाली. अंतिम फेरीपर्यंत रंगतदार ठरलेल्या कोलगाव सौभाग्यवती स्पर्धेत २४ महिलांनी सहभाग घेतला. वेशभूषा स्पर्धेत द्वितीय भूमी राणे, तृतीय निधी परब, उत्तेजनार्थ अनिषा ठाकूर व निधी सुतार, ‘कोलगाव सौभाग्यवती’ स्पर्धेत द्वितीय संगीता पाटकर तसेच प्रांजल गोवेकर, नेहा पेडणेकर, मिताली राऊळ यांनी यश मिळविले. परीक्षक म्हणून पालव मॅडम व प्रदीप सावंत यांनी काम पाहिले. सौ. देसाई यांनी प्रास्ताविक केले. मेस्त्री यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सांगेली आल्मेडा रेस्क्यू टीमचे बाबल आल्मेडा, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या सामाजिक कार्याबद्दल माणुसकी प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी कोलगाव ग्रामस्थ बाळा राऊळ, पुंडलिक राऊळ, चंदन धुरी, सुनील परुळेकर, बबन नाईक आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.