47622
सहकारातील योगदानाबद्दल
‘बांदा नवभारत’चा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था मर्यादित बांदा या पतसंस्थेला सहकार चळवळीतील २५ वर्षांच्या योगदानाबद्दल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ओरोस येथे आयोजित ‘पतसंस्थांचे सक्षमीकरण प्रशिक्षण’ कार्यशाळेत पतसंस्थेचे चेअरमन संतोष परब, व्यवस्थापक पृथ्वीराज बांदेकर यांचा जिल्हा निबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सहायक निबंधक कृ. रा. धुळप (कणकवली), एस. एस. कदम (सावंतवाडी) व एस.पी. मरभळ (कुडाळ) आदी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष सुहास देसाई, संचालक सुरेश राठोड, शुभदा गावडे, पूर्वा गवस, सुनील परब, अरुण सुतार, गणेश देसाई, यशदा देसाई, मोहन फाटक, सुरेश सावंत, गजानन सावंत आदींनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.