कोकण

विद्यार्थी रमले रंग-रेषांच्या दुनियेत

CD

47628

विद्यार्थी रमले रंग-रेषांच्या दुनियेत

सावंतवाडीतील रंगभरण स्पर्धा; भोसले स्कूलचा स्तुत्य उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘लर्न अँड ग्रो’ या शृंखलेअंतर्गत लहान मुलांसाठी आयोजित रंगभरण स्पर्धा आज उत्साहात झाली. ज्युनिअर व सीनिअर केजी, पहिली व दुसरी आणि तिसरी व चौथी अशा तीन गटांत घेतलेल्या या स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्‍घाटन संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते झाले. प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, परीक्षक बी. बी. शिरोडकर व मुख्याध्यापिका प्रियांका डिसोझा उपस्थित होत्या.
स्पर्धेच्या प्रारंभीच विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत नियमावली स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर मुलांना गटनिहाय चित्रांचे वाटप केले. पहिल्या दोन गटांसाठी दिलेले चित्र रंगवणे आणि तिसऱ्या गटासाठी चित्र काढून रंगवणे असे स्वरूप होते. रंगीत खडू, पेस्टल कलर्स, वॉटर कलर्स अशा विविध माध्यमातून मुलांनी चित्रे रंगविली. सहभागी मुलांच्या पालकांसाठी ठिपक्यांच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक पालक उत्साहाने सहभागी झाले. परीक्षक म्हणून बी. एस. बांदेकर फाईन आर्टस् कॉलेजचे प्रा. बी. बी. शिरोडकर उपस्थित होते.
सर्व चित्रांचे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांद्वारे विजेत्यांची नावे जाहीर करू, असे सांगितले. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र वितरित केले. यानिमित्ताने शाळेचे कलाशिक्षक गजानन पोपकर यांनी रंगवलेल्या स्टोन पेंटिंग कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भोसले स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT