कोकण

राजभाषेचा सर्वोच्च क्षेत्रीय पुरस्कार

CD

बँक ऑफ इंडियाच्या
रत्नागिरी शाखेला पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : हिंदीचा प्रचारप्रसार कार्य करणाऱ्या संस्थांना भारत सरकार, राजभाषा विभागद्वारा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार नगर राजभाषा समिती आणि बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला घोषित करण्यात आला होता.
नगर राजभाषा कार्यान्वयन समिती व बँक ऑफ इंडियाने विविध क्षेत्रात केंद्र सरकारचे हिंदीच्या प्रचारप्रसाराचे काम केले आणि शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. समितीचे स्वतंत्र कार्यालय त्याचबरोबर हिंदी, मराठी पुस्‍तकांचे ग्रंथालय बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालयाने सर्व कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करून दिली आहे. समितीच्या संयोजनाचे कार्य बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाकडे सोपवलेले आहे. हा पुरस्कार रत्नागिरी शहरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालय, विमा कंपनी तथा बँकांच्या कार्यालयांनी केलेल्या हिंदीच्या कार्याचा गौरव असल्याचे समितीचे अध्यक्ष देवरे यांनी सांगितले. बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयामधील आंतरिक कामाकाजामध्ये हिंदीचा उत्कृष्ट प्रयोग केला जातो. प्रत्येक तिमाहीमध्ये ई-पत्रिका प्रकाशित केली जाते. विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ९३ शाखांमध्ये क्षेत्रीय भाषा मराठीबरोबरच हिंदीचा प्रयोग केला जातो. या कार्याची नोंद घेऊन केंद्र सरकारने पुरस्कार प्रदान केला. समितीचे सदस्य सचिव व बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक राजभाषा म्हणून गायकवाड काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT