-rat२५p२७.jpg-
२५N४७६६३
खेड ः बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना संस्थेचे पदाधिकारी.
---
आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत
नील पाटणे देशात अव्वल
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ ः येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या नील पाटणे याने आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत १०० टक्के पर्सेन्टाईल गुण मिळवत देशात प्रथम येण्याचा मान मिळवला. देशपातळीवर ३० जानेवारीला घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (JEE. B. Arch) प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेच्या माध्यमातून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या पदवीसाठी दरवर्षी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ठ होतात. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी स्कूलचे १४ विद्यार्थी बसले होते. देशभरातील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांमधून नील पाटणे याने देशात प्रथम येण्याचा मान मिळवून नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पात्र ठरला आहे. रोटरी शाळेचे पूर्वा साळवी (९९.८६), पर्सेन्टाईल व कोकण विभागात द्वितीय, यश राऊल (९९.८४), कोकण विभागात तृतीय, आयशा तिसेकर (९९.४२), अभिषेक चव्हाण (९९.२६), आरूषी साबडे (९९), मनाल तिसेकर (९८.८८), सावरी जोशी (९६.८६), केतकी शिर्के (९६.२६), जय पवार (९५.१२), श्रेयस जाधव (९४.५४), श्रवण कदम (९३.५२), सावरी बुटाला (९०.८५), साहिल पालवे (९०.१८) यांचा समावेश असून, यापैकी ६ विद्यार्थ्यांना ९९ पर्सेन्टाईलपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी रोटरी स्कूलची ही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.