कोकण

ःसावर्डेतील मैदानाचे व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंगकडून कौतुक

CD

-ratchl२५५.jpg-
P२५N४७६८७
चिपळूण ः टर्फ विकेट मैदानाचे उद्‍घाटन करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यर व रिंकू सिंग
--------------

सावर्डे मैदानाचे रिंकू, अय्यरकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः गोविंदराव निकम क्रीडानगरीमधील सीझन बॉल (टर्फ विकेट) क्रिकेट मैदानातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यर व रिंकू सिंग यांनी व्यक्त केला.
आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने तालुक्यातील खरवते दहिवली येथील गोविंदराव निकम क्रीडानगरीमध्ये शिक्षणसंस्थेतर्फे सीझन बॉल टर्फ विकेट क्रिकेट मैदान तयार करण्यात आले आहे. या मैदानाचे मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित, प्रशिक्षक दिनेश लाड, सचिन कोळी यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. अय्यर व सिंग यांनी या मैदानातील सोयीसुविधा पाहून समाधान व्यक्त केले. या मैदानात रणजी स्पर्धादेखील होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. पंडित यांनी गोविंदराव निकम क्रीडा नगरीच्या सीझन बॉल टर्फ क्रिकेट मैदानात स्थानिक क्रिकेटपटूंना चांगले मैदान मिळाल्याचे सांगितले. या वेळी आमदार शेखर निकम, सह्याद्री शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडीक, माजी सभापती पूजा निकम, अनिरूद्ध निकम, सुभाष मोहिरे, उपसरपंच जमीर मुल्लाजी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT