ratchl२५६.jpg -
47688
चिपळूणः अभिजित खताते यांना उपसरपंचपदी विराजमान करताना सरपंच सुगंधा माळी, सदस्य आणि पदाधिकारी.
------------
खेर्डीच्या उपसरपंचपदी
अभिजित खताते बिनविरोध
चिपळूण, ता. २५ः श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिजित खताते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांना सामावून घेत गावात विविध शासकीय योजना राबवण्यात येतील शिवाय ग्रॅव्हिटी पाणीयोजनेच्या कामाला गती देण्यास कटिबद्ध राहू, असा विश्वास उपसरपंच खताते यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच सुगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी खताते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच सचिन मोहिते यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. निवडीनंतर खेर्डीसह तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच खताते यांचे अभिनंदन केले. निवडीनंतर खताते म्हणाले, गावात जास्तीत जास्त शासकीय योजना राबवण्यास प्राधान्य दिले जाईल.
ग्रॅव्हिटी पाणीयोजनेतून खेर्डी गावास पाणी मिळणार आहे. सध्या या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आगामी कालावधीत या योजनेस गती देण्याचा प्रयत्न राहील. गावातील सर्व कुटुंबांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात येईल. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव जयंद्रथ खताते, माजी सरपंच सुनील मेस्त्री, माजी सभापती स्नेहा मेस्त्री, माजी सरपंच प्रकाश पाथरवट, अजित खताते, शशिकांत कासार, विनोद भुरण आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.