सार्वजनिक ठिकाणी
मद्य पिणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील साळवी स्टॉप, रेल्वेस्टेशन, जे. के. फाईल्स येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्या पाचजणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदल रामशरम राय (४९), मोहम्मद शोएब युनूस (२६), चेतन नार्वेकर (३९), निखिल प्रल्हाद शेट्ये (३७), शशिकांत शांताराम कुळ्ये (३५) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना सोमवारी (ता. २४) सायंकाळी सहा ते रात्री साडेआठच्या सुमारास निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश पवार, सहाय्यक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, पोलिस हेडकॉन्स्टेबल आशिष भालेकर, महेंद्र खापरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---
साहित्याची नासधूस
करणाऱ्यांवर गुन्हा
पावस ः तालुक्यातील रनपार येथे न्यायालयाचा मनाई आदेश असताना घरात अतिक्रमण करून शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक वामन सुर्वे व त्याची पत्नी अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ३१ जानेवारीला सकाळी रनपार-गोळप येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विनायक सुर्वे व त्याची पत्नी यांनी दिवाणी न्यायालयाचा मनाई आदेश असताना संजय सुर्वे यांच्या ताब्यातील वहिवाटीतील घरात अतिक्रमण करून घरातील साहित्याची नासधूस केली. तसेच, फिर्यादी यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संजय वामन सुर्वे (वय ५४) यांनी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.