कोकण

एसटीच्या छताची झडप उडून चारचाकीवर आदळली

CD

एसटीची झडप मोटारीवर आदळली
मार्गताम्हाणेतील घटना ; काच फुटून नुकसान
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २५ ः गुहागर आगाराच्या शिवशाही बसच्या छताची झडप उडून पाठीमागून येणाऱ्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागावर आढळली. या घटनेत मोटारीची काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात मार्गताम्हाने अनंत शिर्के मंगल कार्यालयाजवळ सोमवारी (ता. २४) दुपारी एकच्या सुमारास अपघात झाला.
गुहागर आगाराची गुहागर ते चिपळूण ही दुपारी बारा वाजता सुटणारी शिवशाही वातानुकूलित बस मार्गताम्हाने शाळेच्या पुढे आल्यावर बसवरील छताचे झडप उडाले. बस वेगात असल्यामुळे झडप मागून येणाऱ्या मोटारीच्या दर्शनी भागावर जोरात आदळले. त्यामध्ये मोटारीची काच फुटली. आतील प्रवासी हे गुहागरला पर्यटनासाठी आले होते. ते पुन्हा कल्याणच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले होते. या वाहनातील पर्यटक प्रवासी थोडक्यात वाचले. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी रामपूर पोलिस दूरक्षेत्राचे पोलीस व गुहागर आगाराचे अधिकारीही दाखल झाले होते. या घटनेची नोंद गुहागर पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway helmet rule Kolhapur : कोल्हापूर महामार्गावर दुचाकीस्वारांना ‘नो हेल्मेट-नो एन्ट्री’, १६ मार्चपासून नियम लागू

'कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याची आजही लाज वाटते' श्रेया घोषाल हिचं वक्तव्य, म्हणाली...'तशी गाणी...'

India vs England: वानखेडेवर महासंग्राम! सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी भारत सज्ज; धोकादायक इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीची उत्कंठा शिगेला

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुक उमेदवारांनी केले अर्ज

Flight Ticket: वाढलेल्या तिकीट दरांमुळे विद्यार्थी त्रस्त; दुबईतील भारतीय दूतावासाने संपर्क न साधल्याने चिंतेत भर

SCROLL FOR NEXT