कोकण

मालवणात भंगार व्यवसायिकाकडून अनधिकृत वाहन ताब्यात

CD

भंगार व्यावसायिकाचे
अनधिकृत वाहन ताब्यात

मालवण, ता. २५ : तालुक्यातील भंगार व्यवसायिकांकडे अनधिकृत गाड्या वापरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार नीलेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जाऊन तपासणी केली. यात एका कंपनीचे वाहन अनधिकृतपणे वापरात असल्याचे निदर्शनास आल्याने ते ताब्यात घेतले. जिल्हा परिवहन अधिकारी श्री. काळे यांनी ही माहिती दिली.
श्री. काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी मालवण पोलिस ठाण्यात जमा केली असून यानंतरच्या काळातही भंगार विक्रेत्यांकडे जिल्ह्यात अनधिकृतपणे वापरात असलेल्या गाड्यांची तपासणी करून त्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत. आज आमदार राणेंच्या सूचनेनुसार जिल्हा परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मालवणात भंगार विक्रेत्यांच्या वाहनांची तपासणी केली. यावेळी एम. एच. ०७ एजे- ३५८९ ही गाडी अनधिकृतरित्या वापरात असल्याचे निदर्शनास आले. ती परिवहन विभागामार्फत ताब्यात घेऊन पोलिसांकडे सुपूर्द केली. याठिकाणी आज अन्य दुचाकी वाहने आढळली नाहीत. मात्र, तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. या पथकात मोटर वाहन निरीक्षक संदीप भोसले, केतन पाटील, प्रीतम पवार आदी अधिकारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात! कोथरुड, बाणेर भागात ढगांचा गडगडाट; हवामान विभागाचा अलर्ट

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

"त्याचं आधीच ठरलंय.." राकेशच्या घटस्फोटावर बहीण पहिल्यांदाच झाली व्यक्त ; "ते दोघं अजूनही.."

चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यात यूपी पोलीस निष्क्रिय; पण मुंबईच्या पोरीने हिंम्मत दाखवली, स्वतःच चोराच्या घरी पोहोचली अन्...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

SCROLL FOR NEXT