कोकण

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे समूहगीत गायन स्पर्धेत यश

CD

swt264.jpg
47778
आजगावः समूहगीत स्पर्धेत सहभागी विद्यार्थी.

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे
समूहगीत गायन स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ः विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगावचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवारी (ता. २५) समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ श्रेणी पटकावली.
या विद्यार्थ्यांमध्ये सहावीतील अस्मी प्रभूतेंडोलकर, स्पृहा आरोंदेकर, अस्मी सावंत, तनिष्क पवार, वैष्णव सावंत, हेरंब नाटेकर, राज गवस, पाचवीतील कुणाल गावडे, मनवा साळगावकर, चौथीमधील लिशा सामंत, जान्हवी सावंत, द्वैत काळसेकर, उगम वेर्लेकर, वरद राणे, यज्ञेश पवार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ श्रेणी पटकावली.
या विद्यार्थ्यांना प्रशालेतील संगीतशिक्षक कपिल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. या संगीताला अमन अणावकर यांनी ढोलकीची साथ, प्रसाद सावंत यांनी ड्रमची साथ दिली. प्रशालेतील संगीत शिक्षक कपिल कांबळे यांना व वरील स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संचालक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Supreme Court: लाखोंच्या आस्थेला चुकीचे ठरविणे कठीण; सरन्यायाधीशांची टिप्पणी, शबरीमला प्रकरण सुनावणीवेळी धर्माला खिळखिळे न करण्याचे आवाहन!

Women Reservation: महिला आरक्षणापुरताच पाठिंबा; ‘इंडिया’ आघाडीचा निर्णय, मतदारसंघ फेररचनेला कडाडून विरोध, विरोधकांनी डागली ताेफ..

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT