कोकण

गावखडीतील रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

CD

- rat२६p२.jpg-
P२५N४७७६२
गावखडी ः येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अकरा खांबांची एकवीस पायली तांदळाची पूजा बांधण्यात आली, हे या उत्सवाचे खास आकर्षण असते.
- rat२६p३.jpg-
२५N४७७६३
गावखडी ः येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सवानिमित्त दर्शनासाठी भक्तांच्या रांगा.
----
गावखडीमधील रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव
भाविकांची गर्दी ; एकवीस पायली तांदळाची पूजा ठरली आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २६ ः ओम नमः शिवाय...ओम नमः शिवाय...असा मंत्रोच्चाराचा जप करत...अपूर्व उत्साह आणि चैतन्यमय वातावरणात रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या मंदिरात उभारलेली अकरा खांबांच्या एकवीस पायली तांदळाची पूजा उत्सवाचे खास आकर्षण असते.
गावखडी येथील श्रीदेव रामेश्वराचा शिवरात्री उत्सव मंगळवारपासून (ता. २३) मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरू झाला. श्रीदेव रामेश्वर देवस्थान, शिवरात्र महोत्सव समिती गावखडीचे सर्व पदाधिकारी आणि श्रीदेव रामेश्वर देवस्थान विश्वस्त समितीचे सभासद, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाच दिवस शिवरात्र महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा खांबांची व एकवीस पायली तांदळाची महापूजा बांधण्यात येते. ही महापूजा बांधण्यासाठी काही भक्तगण तांदूळ देतात. अशी महापूजा इतरत्र पाहावयास मिळणे दुर्मिळ आहे. ही तांदळाने बांधलेली महापूजा हे भक्तगणांचे आकर्षण असते. गावखडीचे जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर नवसाला पावणारी असल्यामुळे लाखो भाविक येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त नतमस्तक होतात. श्रीदेव रामेश्वरा तुझी कृपा सदा आम्हावरी राहूदे, असे साकडे भाविकांनी घातले. श्रीदेव रामेश्वर मंदिरात दिव्यांग, वयोवृद्ध माणसे तसेच भाविकांना सुलभ दर्शनासाठी जाता यावे यासाठी सुनियोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Vande Bharat Train Route : मुंबई, पुणे, सोलापूर, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार; जेवणाच्या बिलासह तिकीट

Kangana Ranaut: ''...तर आम्हाला आतापर्यंत मुलं झाली असती'', चिराग पासवान यांचं नाव घेऊन कंगना रणौत भलतंच बोलल्या

‘ही दोस्ती तुटायची नाय’गाण्याव अशोक सराफ-सचिन पिळगांवकरांचा धमाकेदार डान्स; सोशल मीडियावर Viral Video

Ujjain: महाकाल भक्तांना धक्का! आता 'फ्री'मध्ये पाहता येणार नाही भस्म आरती; मंदिर समितीचा मोठा निर्णय, पाहा नवीन नियम

Train Stopped For Robbery Case : थरारक घटना! मानवत रोडवर सिग्नल यंत्रणा निकामी करून एक्स्प्रेस लुटली; महिला प्रवाशांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT