कोकण

आस्थामध्ये मोफत मार्गदर्शन शिबिर

CD

श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी
आस्थामध्ये २ मार्चला मोफत शिबिर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : पवई (मुंबई) येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल आणि आस्था सोशल फाउंडेशनच्यावतीने मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. जन्मतः व जन्मपश्चात श्रवणदोष असणाऱ्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलताना अडचण येणाऱ्या अशा सर्व बालकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी तसेच मोठ्या वयोगटांतील व्यक्तींची मोफत तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. हे शिबिर २ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिवाजीनगर येथील आस्था थेरपी सेंटरमध्ये होणार आहे.
शिबिरात श्रवण व वाचा दोषसंदर्भात तपासणी केली जाणार आहे तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या संदर्भ सेवा व त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. या शिबिरात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण व ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोगटे या मुलांच्या ऐकण्या व बोलण्यासंदर्भातील समस्यांबाबत मार्गदर्शन करतील. शिबिराला येताना पालकांनी मुलांच्या पूर्वतपासणी रिपोर्ट आणावेत.
जिल्ह्यातील श्रवण व वाचादोष असलेले बालक उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत, लवकरात लवकर योग्य निदान होऊन बालके आवश्यक उपचारानंतर मुख्य प्रवाहात यावीत यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे, असे आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे प्रमुख समन्वयक व स्पीच थेरपिस्ट संकेत चाळके यांनी सांगितले. जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ, कान, नाक, घसातज्ज्ञ, अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांनी त्यांच्या संपर्कातील अशा बालकांच्या पालकांना या शिबिराची माहिती द्यावी, असे आवाहन आस्थाच्या सचिव व प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT