कोकण

भैरी मंदिरात महाशिवरात्रोत्सव

CD

rat२६p५.jpg-
२५N४७७९३
रत्नागिरी : ग्रामदैवत श्री देव भैरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवारी दर्शनासाठी लागलेली रिघ पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात श्री देव तृणबिंदूकेश्वर.
----
श्री भैरी- तृणबिंदूकेश्वर मंदिरात महाशिवरात्रोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर मंदिरात प्रथेप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. तृणबिंदूकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून रिघ लागली होती. दिवसभर खिचडी, दूधप्रसादाला प्रतिसाद मिळाला. मंदिरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली. लघुरूद्र, भजनांमुळे वातावरण शिवमय झाले.
बेलाची पाने, फुले, नारळ, अगरबत्ती असे पूजेचे साहित्य सर्वांच्या हाती पाहायला मिळाले. मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या सूस्वर भजनांनी वातावरण भक्तीमय झाले होते. मंदिरात दिवसभर हजारो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी श्रीदेव तृणबिंदूकेश्वरावर लघुरूद्र करण्यात आला. त्यानंतर श्रीदेव भैरीवर अभिषेक, भजन व कीर्तन होईल. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळपर्यत खिचडी, दूधप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी १० वाजता भजनांना प्रारंभ झाला. श्री कालभैरव प्रासादिक भजन मंडळ, श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ, श्री दुर्गामाता महिला भजन मंडळ यांची भजने रंगली तसेच सायंकाळी कीर्तनकार प्रवीण मुळये यांनी महाशिवरात्रीचे कीर्तन सादर केले. त्यानंतर श्री सिद्धिविनायक भजन मंडळ, श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ आणि भैरव प्रासादिक भजन मंडळ, श्री दत्त प्रासादिक भजन मंडळाच्या भजनांनी वातावरण शिवमय केले. रात्री आरती, भोवत्यांनी महाशिवरात्री उत्सवाची सांगता झाली.
श्री देव भैरी, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे यांच्यासमवेत सर्व विश्वस्त मंडळी, गुरव मंडळी महाशिवरात्री उत्सवासाठी मंदिरात उपस्थित होते. बारा वाड्यांतील ग्रामस्थ, रत्नागिरीकरांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT