कोकण

मसुरेत शनिवारी कबड्डी स्पर्धा

CD

मसुरेत शनिवारी
कबड्डी स्पर्धा
मसुरे : नवतरुण मित्रमंडळ डांगमोडे यांच्यातर्फे आयोजित आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवारी (ता. ८) सायंकाळी ६ वाजता मसुरे डांगमोडे रवळनाथ मंदिर येथे श्री भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त केले आहे. विजेत्या पुरुष संघाला अनुक्रमे ७००० रुपये व चषक, उपविजेत्या संघास ५००० रुपये व चषक, तसेच महिला गटासाठी प्रथम ७००० व चषक, द्वितीय ५००० व चषक देण्यात येईल. तसेच दोन्ही गटातील उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व अष्टपैलू खेळाडूंना प्रत्येकी ५०० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व चषक (कै.) शिवाजी गंगाराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केले आहेत. खेळाडू व हितचिंतकांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. स्पर्धेचे उद्‌घाटन माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना नेते संजय आंग्रे आदी उपस्थित राहणार आहेत. कबड्डी स्पर्धेसाठी नितीन हडकर व दत्तप्रसाद पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
.................
देवगड तालुक्यामध्ये
किनारी भागात उकाडा
देवगड ः तालुक्याच्या किनारी भागातील वातावरणामधील उकाडा वाढला आहे. अधूनमधून आकाशात काळे ढग जमा होत असतात. रात्रीच्यावेळी प्रकाशाकडे पाखरे (लहान कीटक) जमा होत असल्याने पावसाची लक्षणे मानली जात आहेत. दरम्यान, अचानक उकाडा वाढल्याने आंबा, काजू पिकांसाठी वातावरण परिणामकारक ठरू शकते, असे मत नोंदवले जात आहे. गेले काही दिवस वातावरणातील उष्णतेत वाढ झाली आहे. रात्रीच्यावेळी दवाचे प्रमाण असते. अधूनमधून आकाशात काळे ढग जमा होत असतात. दिवसा उन्हाचा पारा चढलेला असतो. पावसाळ्याप्रमाणे सध्या सायंकाळच्यावेळी दिव्यावर पाखरे येतात. त्यामुळे वळवाचा पाऊस कोसळण्याची लक्षणे मानली जात होती. तसे झाल्यास आंबा, काजू पिकासाठी धोकादायक ठरू शकते, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT