कर्तव्यनिष्ठा, कार्यगौरव पुरस्कार जाहीर
बोडस ट्रस्ट ; शिंदे, खरे, घवाळी, कोळंबेकर, पावसकर सत्कारमूर्ती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : बोडस चॅरीटेबल ट्रस्टने २०२४-२५ वर्षासाठीच्या कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कारांची घोषणा आज केली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ४ व सिंधुदुर्गमधील एकाचा समावेश आहे. रवींद्र शिंदे, शलाका खरे, प्रभाकर घवाळी, सुजाता कोळंबेकर, निकेत पावसकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
गेली १३ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती किंवा विशेष कार्य करणाऱ्या असाधारण व्यक्ती आणि समाजसेवी संस्थांना बोडस ट्रस्ट पुरस्कार देते. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि रुपये ३,००० असे आहे.
कुवारबांव येथील जागुष्टे हायस्कूल येथे प्रथम ५ वर्षे विनाअनुदानित आणि नंतर अनुदानित तत्वावर ३३ वर्षे असे सुमारे ३८ वर्षे चतुर्थ श्रेणी कर्मचारी रवींद्र भिवा शिंदे (रा. रवींद्रनगर, कारवांची वाडी) यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गुहागर येथील श्री दुर्गादेवी देवस्थान येथे १५ वर्षे व्यवस्थापिका या पदावर कार्यरत शलाका चंद्रशेखर खरे (वरचा पाट) यांचा कार्यगौरव पुरस्कार दिला जाईल. तसेच दिव्यांग असूनही ३० वर्षे हातखंबा तिठा येथे दोन प्रकारच्या सेवा देऊन निवृत्त झालेले प्रभाकर कमलाकर घवाळी (तारवेवाडी, हातखंबा), गाडीतळ येथील जनसेवा ग्रंथालयातील लिपिक व २० वर्षे शब्दांकुर या हस्तलिखित दिवाळी अंकाचे एकहाती पुनर्लेखन करणाऱ्या सुजाता मधुकर कोळंबेकर यांना कार्यगौरव जाहीर झाला आहे. तळेरे (ता. कणकवली) येथे १९ वर्षात १७०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेशपत्रांचा संग्रह केलेले निकेत नरहरी पावसकर (कनिष्ठ लिपिक, कासार्डे विद्यालय) यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
-------
लवकरच वितरण
रत्नागिरी तालुक्याबाहेरील २ सन्मानितांना त्यांचे सन्मानपत्र, पुस्तक, शाल आणि पुरस्काराची रक्कम त्यांच्या कार्याच्या ठिकाणी रजिस्टर पोस्ट आणि बँकद्वारे दिली जाणार आहे. रवींद्र शिंदे, सुजाता कोळंबेकर आणि प्रभाकर घवाळी यांचा गौरव ७ ते ९ मार्च या कालावधीत त्यांच्या कामाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲड आदिती अभिजित पटवर्धन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.