कोकण

रत्नागिरी- बसस्थानकांत सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांसह पोलिसांची गस्तही सुरू

CD

सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांसह पोलिसांची गस्तही सुरू

प्रज्ञेश बोरसे : बसस्थानके, आगार, कार्यशाळांमध्ये सुरक्षेसाठी पावले

रत्नागिरी, ता. ४ : पुणे, स्वारगेट येथे घडलेल्या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांची सुरक्षा तपासण्यात केली. सर्व बसस्थानके, आगार, कार्यशाळा, टायर रिमोल्डिंग प्लॅंट आदी ठिकाणी जवळपास ७० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. खासगी कंपनीचे व एसटीचे जवळपास ५० सुरक्षारक्षक २४ तास कार्यरत असतात. शिवाय पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेस पोलिसांची जास्त वेळ गस्त ठेवण्यास सांगितली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली आहे, अशी माहिती एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे. सर्व बसस्थानकांमधील सीसीटीव्ही तपासण्यात आले. वस्तीला आलेल्या बस लॉक करण्याचे सक्त आदेश चालक, वाहकांना देण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस बसस्थानकात पोलिसांना गस्त घालण्याची विनंती एसटी विभागाने केली आहे.
रत्नागिरी विभागातील सर्व बसस्थानकांच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांनी सर्व बसस्थानकांचे सीसीटीव्ही तपासले आहेत. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी येणारे प्रवासी, विनाकारण येऊन थांबणाऱ्यांचाही आढावा घेण्यात आला. तसेच भीक मागणारे बसस्थानकात निवारा करतात, त्याबाबतही कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. अशा लोकांना वेळीच त्या ठिकाणाहून बाहेर काढले जाणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
०००००
चौकट

बसची जबाबदारी चालक-वाहकाची
एसटी बसची जबाबदारी चालक-वाहकाची असते. बस रिकामी झाल्यानंतर ती ज्या ठिकाणी वस्तीसाठी उभी करण्यात येते त्या ठिकाणी ती आतून लॉक करणे गरजेचे असते. बसच्या सर्व काचा व्यवस्थित लावल्याची खातरजमा चालकांनी व वाहकांनी केली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बसस्थानकांमध्ये सुरक्षारक्षकदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
-----------

रोमिओंवर कारवाई होणार
शाळा, महाविद्यालये सुटल्यानंतर काही रोडरोमिओ विनाकारण बसस्थानक परिसरात येऊन तासनतास थांबतात. असा प्रकार समोर आल्यास त्यासंबंधी तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. प्रसंगी पोलिसांचीदेखील मदत घेण्यात येणार आहे. गर्दीच्यावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकदेखील प्रवाशांमध्ये सहभागी होतात. अशा लोकांवर देखील नजर ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT