मारहाणप्रकरणी
तिघांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील परटवणे चौक येथे रस्ता ओलांडणाऱ्या लहान मुलीला दुचाकीची धडक लागली. स्वार थांबला असताना तीन तरुणांनी स्वाराला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद धुळप, सुमित धुळप, सुयोग धुळप (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. २) सायंकाळी सहा वाजता घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश मंगेश शिवलकर (वय २०, रा. सड्ये शिवलकरवाडी, रत्नागिरी) हे दुचाकी घेऊन परटवणेनाका येथे आले असता त्या ठिकाणी उभा असलेल्या मिनीबसच्या समोरून एक लहान मुलगी रस्ता ओलांडत असताना यश शिवलकर यांच्या गाडीचा धडक लागली. ते पुढे जाऊन थांबले असता अचानक संशयितांनी तेथे येऊन शिवीगाळ करून मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत यश शिवलकर हे जखमी झाले. या प्रकरणी शिवलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सार्वजनिक ठिकाणी
मद्य पिणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील साळवी स्टॉप-जलतरण तलाव परिसरात मद्यपान करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्दाम हजरत पठाण (वय ३०), दीपक नंदलाल भारती (वय ३५), परमहंस शारदा शर्मा (वय ३५) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. ३) सायंकाळी साडेसहा ते आठच्या सुमारास जलतरण तलाव साळवीस्टॉप येथे निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित साळवीस्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना सापडले. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल अरूण चाळके, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, पोलिस हेडकॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
वृद्ध कामगाराचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः हातखंबा येथील ढाब्यावर सफाईचे काम करणारा प्रौढ बेशुद्धावस्थेत आढळला. उपचारासाठी त्याला खासगी व अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर बारक्या झोरे (वय ४०, रा. हातखंबा, ईश्वर ढाबा, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ३) रात्री आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. शंकर झोरे हे ढाब्यामध्ये सफाई कामगार म्हणून कामाला होते. ते तेथील रूममध्ये आराम करत होते. दुपारी जेवणासाठी आले नाहीत म्हणून तेथील एका कामगाराने रूममध्ये जाऊन पाहिले असता त्यांची हालचाल होत नव्हती. तत्काळ त्यांना खासगी दवाखान्यात नेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.